घरमहाराष्ट्रसिंहगड घाटात दरड कोसळली; रस्ता बंद

सिंहगड घाटात दरड कोसळली; रस्ता बंद

Subscribe

सिंहगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या हजारो पर्यंटकांची हिरमोड झालाय. कारण सिंहगड घाटात दरड कोसळल्यामुळे सिंहगडाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला आणि ट्रेकर्सला आकर्षित करणारा सिंहगड घाटातमध्ये दरड कोसलळी आहे. आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यामुळे सकाळपासून सिंहगड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सिंहगडाकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रविवार असल्याने सिंहगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांची निराशा झाली आहे. सध्या दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

शनिवार सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. पुण्यामध्ये सिंहगडावर पावसाळ्यात ट्रेक करण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स या ठिकाणी आले होते. मात्र पहाटेच सिंहगड घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे हवेली पोलीस आणि वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना अर्ध्यातूनच माघारी परतावे लागले. त्यामुळे त्यांची निराशा झाली.

- Advertisement -

सिंहगड घाटामध्ये दरड कोसळ्यामुळे मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर आली आहे. सध्या दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र पावसामुळे या कामामध्ये अडथळा येत आहे. दरड हटवण्याचे काम कधी पर्यंत पूर्ण होईल हे सांगता येत नसल्याने आज दिवसभरासाठी या ठिकाणची दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मागच्या वर्षी सिंहगड घाटात अशीच दरड कोसळल्याची घटना घडली होती. यावेळी हजारो पर्यटक गडावर अडकले होते. दरड हटवण्याच काम युद्धपातळीवर करुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती. आणि हजारो पर्यटकांची सुटका करण्यात आली होती. ही घटना संध्याकाळच्या वेळी घडली होती. त्यामुळे गडावर अनेक पर्यटक अडकले होते. मात्र यावेळी दरड कोसळल्याची घटना सकाळी घडल्यामुळे पर्यटक अडकले नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -