घरमहाराष्ट्रकामचुकार अधिकाऱ्यांमुळे वैतागलेल्या उपमहापौरांनी कार्यालयाला लावले टाळे

कामचुकार अधिकाऱ्यांमुळे वैतागलेल्या उपमहापौरांनी कार्यालयाला लावले टाळे

Subscribe

लातूर महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणे काम करत आहेत. त्यांच्या या कारभाराला कंटाळून सत्ताधारी भाजपच्या उपमहापौरांनी उचलले अनोखे पाऊल.

लातूर महानगर पालिकेतील कामचुकार आणि बेशिस्त अधिकारी आणि कर्मचारी यांना शिस्त लावण्यासाठी उपमहापौरांनी एक अजब पाऊल उचलले आहे. लातूर महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणे काम करत आहेत. त्यांच्या या कारभाराला कंटाळून सत्ताधारी भाजपचे उपमहापौर देवीदास काळे यांनी सोमवारी आपल्या अनोख्या पध्दतीने काम करण्याचा निर्णय घेतला. काळे यांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत. त्यांनी पालिसा प्रशासनाला धक्का दिला. शहर नियोजन विभाग कार्यालय त्यांनी बंद केले. ही माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. कार्यालय बंद केल्यामुळे काही कार्यकर्ते आणि अधिकारी इकडे तिकडे भटकू लागले.

याबाबत सांगिताना काळे यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आळशी वर्तनाला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षापासून आम्ही काही तरी चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र काँग्रेस सरकारपासून असलेली पूर्वीची सवय अद्याप काही संपलेली नाही. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी मला हा उपाय करावा लागला. गेल्या सहा महिन्यापासून फाईलचे ढिगारे लागले होते. मात्र याठिकाणी ढिमा कारभार सुरु आहे. लोककल्याणासाठी काही प्रशासकिय निर्णय घेतला जात नव्हता असे, काळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -