‘काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का’; राज ठाकरेंना प्रत्युत्तर

‘लाव रे व्हिडिओ’, असा आदेश देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना भाजपने सडेतोड उत्तर दिले आहे. भाजपने देखील काही व्हिडिओ ट्विट करत काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का? असं म्हणत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

Maharashtra
lav re to video : bjp hits back mns tweets video says we too have few video lav re to video
'काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का'; राज ठाकरेंना प्रत्युत्तर

‘लाव रे व्हिडिओ’, असा आदेश देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या जाहीर सभांमध्ये भाजपाची पोलखोल करणारे व्हिडिओ दाखत आहेत. मात्र याला भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. ‘काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का’, असे म्हणत भाजपने राज ठाकरेंना सडेतोड उत्तर देत भाजपने मनसेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसंदर्भात प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचे व्हिडिओ ट्विट केले आहेत.

पुराव्यांसकट राज करतात भाषण

गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील राज ठाकरे यांच्या दौऱ्यातील जाहीर सभा चर्चेचा विषय ठरत आहे. पुराव्यांसकट राज यांनी केलेले भाषण लोकांना आकर्षित करत आहे. सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे व्हिडिओ’, असा आदेश देत आहेत. यावरुन आता भाजपने मनसेवर पलटवार केल्याचे दिसून येत आहे.

भाजपने मनसेचा हा व्हिडिओ केला ट्विट

भाजपाने देखील मनसेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. डोंबिवलीतील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी केलेले आरोपांसंदर्भातील बातमी भाजपाने ट्विट केली आहे. डोंबिवलीतील मनसेचे नगरसेवक मंदार हळबे हे फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात, असा आरोप फेरीवाला संघटनांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. हा व्हिडिओ ट्विट करताना भाजपाने म्हटलंय की, ‘काही व्हिडिओ आमच्याकडे देखील आहेत बरं का…! ‘मनसेचे नगरसेवक घेतात
फेरीवाल्यांकडून हप्ते’ #लाव रे व्हिडीओ’

साडी चोरतानाचा व्हिडिओ

भाजपने शुक्रवारी दुपारी आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये मनसेची पदाधिकारी साडी चोरतानाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. ‘मनसे कार्यकर्ते साडी चोरताना’ #लाव रे व्हिडिओ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.


वाचा – ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या मागचे कलाकार; मुंबईच्या डिजिटल रथ राज्याव्यापी दौऱ्यावर

वाच –  ‘यंदा मोदी लाट नाही’, संजय राऊत उवाच