लाखो, करोडोचे ‘आकडे’ पाहून लक्ष्मी थक्क

'लक्ष्मीपूजन' विशेष व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे.

Mumbai

आज लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्ताचे अवचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या या नव्या व्यंगचित्रामध्ये लक्ष्मी माता मोदी, गडकरी आणि फडणवीस या तिनही नेत्यांशी बोलताना दिसत आहे. या चित्रामध्ये भाजपच्या या तीन नेत्यांचे फोटो भिंतीवर लावलेले दाखवण्यात आले आहेत. या फोटोंकडे पाहून लक्ष्मी म्हणतेय, ‘बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे’. लक्ष्मीपूजन असंच या व्यंगचित्राला शिर्षक देण्यात आलं आहे. राज ठाकरे ६ ते ९ नोव्हेंबर याकाळात आपल्या व्यंगचित्रांमधून अशाचप्रकारे सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच व्यंगचित्रांच्या या मालिकेची सुरुवात झाली असून, आजचं हे तिसरं चित्र आहे.


वाचा: अंबानींसाठी देश विकायला काढलाय का? | राज ठाकरे

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही ‘दिवाळी विशेष’ व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर तूफान गाजत आहेत. सोशल मीडियावर नेटिझन्सकडून या चित्रांना संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. एकीकडे राज ठाकरे आणि मनसे समर्थक या व्यंगचित्रांची वाहवाह करत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनी या मुद्द्यावरुन राज ठाकरेंवरच टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, राज ठाकरे आता  उद्या कोणतं नवीन व्यंगचित्र साकारणार आणि त्याद्वारे कोणाला टार्गेट करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असणार.

राज ठाकरेंची ‘दिवाळी’ विशेष व्यंगचित्रांची मालिका


वाचा: राष्ट्रगीत येईना; भाजप वक्त्याकडून राष्ट्रगीताचा अपमान

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here