घरमहाराष्ट्रनाशिकविंचुरे येथेही बिबट्याच्या हल्ला; युवक जखमी

विंचुरे येथेही बिबट्याच्या हल्ला; युवक जखमी

Subscribe

आरडाओरडा केल्याने नागरिक धावून आले

नाशिकरोड । दारणा काठच्या गावांमध्ये बिबट्याचे हल्ले सुरु असताना जिल्ह्यातील विंचुरे (ता. बागलाण) येथेही शनिवारी (दि. ४) सायंकाळी झाडावर बसलेल्या बिबट्याने एका युवकावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, समाधान केशव गायकवाड (३५) हे शेतातून मळ्यातील घराकडे जात असतांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखालून जात असतांना त्या झाडावर बसलेल्या बिबट्याने उडी मारुन हल्ला केला, मात्र यावेळी समाधान याने प्रतिकार करत बिबट्याला दूर ढकलेले व आरडाओरडा केल्याने इतर नागरिक त्याच्या मदतीला धावून आल्याने समाधान याचा जीव वाचला आहे, हल्ल्यात हाताला गंभीर जखम झाली ्असून त्याच्यावर सटाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस पाटील पोपट जिभाऊ बच्छाव यांनी दिली. पोलीस पाटील यांनी याबाबत वनविभागाला या घटनेची माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -