घरमहाराष्ट्रपुण्यात बिबट्या जेरबंद!

पुण्यात बिबट्या जेरबंद!

Subscribe

पुण्याच्या आंबेगाव, कळंब येथे बिबट्याने धूमाकूळ घातला होता. परिसरात एकूण तीन बिबट्या आहेत, असे स्थानिकांनी सांगितले आहे. दरम्यान, एका बिबट्याला जेरबंद करण्यात बिबट निवारण केंद्राला यश आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव परिसरामध्ये बिबट्याने दहशत माजवली होती. बुधवारी या बिबट्याने पाच शेळ्यांना ठार केले होते. या परिसरात तीन बिबटे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान, पाच शेळ्यांना ठार केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर गुरुवारी मध्यरात्री एका बिबट्याला जेरबंद करण्यात बिबट निवारण केंद्राला यश आले आहे. या बिबट्याचे वय अंदाजे दोन वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यासह पोलिस कर्मचारी जखमी

- Advertisement -

बिबट्या निवारण केंद्रात रवानगी

आंबेगाव, कळंब येथील धरणमळा परिसरात गेल्या महिनाभरापासून तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून या परिसरातील शेळ्या, गायी, कुत्र्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मारुती उर्फ बाबूनाथ कहडने यांच्या पाच शेळ्या बिबट्यांनी हल्ला करून ठार केल्या. वनविभागाने ताबडतोब त्या ठिकाणी पिंजरा लावून रात्री एकच्या सुमारास एक ते दोन वर्षाचा बिबट्याला पिजऱ्यात जेरबंद केले. पिंजऱ्यावर दोन बिबट्या रात्रभर बसून असल्याचे सुनीता कहडणे यांनी पाहिले. आज सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी या बिबट्यास ताब्यात घेऊन जुन्नर येथील माणिकडोह या बिबटया निवारण केंद्रात त्याची रवानगी केली आहे. दरम्यान, अजून दोन बिबट्या असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

हेही वाचा – कळवण तालुक्यात बिबट्याचे कातडे विक्री करणाऱ्या ५ जणांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -