घरताज्या घडामोडीसिन्नर तालुक्यातील सोनेवाडीत बिबट्याचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील सोनेवाडीत बिबट्याचा मृत्यू

Subscribe

शवविच्छेदनानंतर मोहदरी येथे बिबट्याचा मृतदेह आणून शासकीय नियमांप्रमाणे दफन

नाशिकरोड । श्रीधर गायधनी
सिन्नर तालुक्यातील सोनेवाडीत वृद्ध बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वनविभागाने पंचनामा करत मोहदरी घाटाजवळील शासकीय जागेत बिबट्याचे दफन केल्याची माहिती वनविभागाने दिली.
बुधवारी (दि.५) दुपारी सोनेवाडी (ता. सिन्नर) येथील गणी शेख यांच्या गट नंबर २७३ मधील शेतात पोलीस पाटलांनी वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना फोनवरुन शेतात बिबट्या मृत अवस्थेत दिसून आल्याची माहिती दिली. त्यानंतर सिन्नर वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, रेस्क्यू पथकाचे प्रितीश सरोदे, अनिल साळवे आदी पथकाने घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर पशूवैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मोहदरी येथे बिबट्याचा मृतदेह आणून त्याचे शासकीय नियमांप्रमाणे दफन करण्यात आले.
दरम्यान, हा बिबट्या वयस्कर आहे, त्याचे वय किमान दहा ते बारा वर्षांचे असून त्याला शिकार करणे शक्य न झाल्याने त्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून येत असल्याचेही वनविभागाने सांगितले.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -