घरमहाराष्ट्रआंबेगावमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद

आंबेगावमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद

Subscribe

चांडोली परिसरात बिबट्यांनी अनेक वेळा पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. मात्र आता हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

जंगलात मुक्तपणे वावरणारा बिबट्या आता दबक्या पाऊलांनी शिकारीच्या शोधात लोकवस्तीत येऊ लागला आहे. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे बिबट्याचा लोकवस्ती वावर सीसीटिव्हि कँमेरात कैद झाला आहे. त्यामुळे या गावातील लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नाच्या शोधामध्ये बिबट्या मानवी वस्तीमध्ये येतात. या बिबट्याच्या भीतीमुळे लोकं रात्रीच्या वेळी घराबाहेर पडत नाही तसंच शेताकडे एकट्याने जाणे टाळतात. कारण बिबट्या कधी हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने लोकांमध्ये दहशत आहे.

- Advertisement -

दोन बिबटे सीसीटीव्हीत कैद

आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील संतोष थोरात यांच्या घराजवळ रात्रीच्या सुमारास दोन बिबटे मुक्तपणे फिराताना पहायला मिळाले. चांडोली परिसरात बिबट्यांनी अनेक वेळा पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. मात्र आता हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अन्न पाण्याच्या शोधात बिबट्या लोकवस्तीमध्ये येतात आणि पाळीव प्राण्यांना आपली शिकार करतात. तर कधी मानवी जीवांवरही हल्ले करतात. मानवी वस्तीकडे येतात या बिबट्यांचा अपघातात मृत्यू देखील होतो.

हेही वाचा – 

- Advertisement -

अहमदनगर- कल्याण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -