घरताज्या घडामोडीहॉटेल एसएसकेपाठोपाठ सुयश हॉस्पिटलमध्येही शिरला बिबट्या

हॉटेल एसएसकेपाठोपाठ सुयश हॉस्पिटलमध्येही शिरला बिबट्या

Subscribe

शहरातील बीवायके कॉलेज परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटनेनंतर शनिवारी (दि.३०) मध्यरात्री चांडक सर्कल भागातील हॉटेल एसएसकेच्या रेस्टॉरंटमध्ये बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले.

शहरातील बीवायके कॉलेज परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटनेनंतर शनिवारी (दि.३०) मध्यरात्री चांडक सर्कल भागातील हॉटेल एसएसकेच्या रेस्टॉरंटमध्ये पहाटे दीड वाजेच्या सुमारास बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले. येथून बाहेर पडलेला बिबट्या सकाळी साडेतीन वाजता याच मार्गावरील सुयश हॉस्पििटलमध्ये शिरला. दरम्यान, दोन दिवसांपासून शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांची मात्र चांगलीच पाचावरण धारण बसली आहे.

नाशिकमध्ये बिबट्याची दहशत, हल्ल्यात दोनजणं जखमी

नाशिकमध्ये बिबट्याची दहशत, हल्ल्यात दोनजणं जखमी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 30, 2020

- Advertisement -

एसएसकेच्या रेस्टॉरंटमध्ये शिरलेला बिबट्या काही वेळ थांबून हा बिबट्या आल्या मार्गाने मुंबई नाक्याच्या दिशेने निघून गेला. सीसीटीव्ही फूटेजमध्येही तसे दिसून आले. या घटनेनंतर दीड तासांच्या अंतराने सकाळी साडेतीन वाजता हाच बिबट्या सुयश हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये शिरला. येथील व्यवस्थापनाला पोलिसांनी या भागात बिबट्या असल्याबाबत आधीच सूचना दिली असल्याने सुरक्षा रक्षक त्यादृष्टीने सतर्क होते. बिबट्या आल्याचे सुरक्षा रक्षकांनीही पाहिले.

- Advertisement -

सतर्कता कामी आली

आम्हाला पोलीस यंत्रणेकडून आधीच माहिती मिळाली असल्याने बाहेरील केबिनमध्ये सुरक्षा रक्षकाला थांबण्याची सूचना केलेली होती. हॉस्पिटलचे सर्व गेट बंद राहतील, याचीही काळजी घेण्यात आली होती. सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास भिंत ओलांडून हा बिबट्या आला. उजच्या बाजूला गेल्यानंतर साधारण एका मिनिटांत तो साई स्क्वेअरच्या दिशेने निघून गेला.

– डॉ. हेमंंत ओस्तवाल, व्यवस्थापकीय संचालक, सुयश हॉस्पिटल

मूळ अधिवासाच्या दिशेने गेला असावा

वन्यप्राण्यांनी शिकारीच्या शोधात बाहेर पडले तरीही ते मूळ अधिवासात परततात. हा बिबट्यादेखील इंदिरानगरकडून पुढे लष्करी भागातील त्याच्या मूळ अधिवासात गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे, लहान मुलांसह ज्येष्ठांचीही काळजी घ्यावी.

– सुनील वाडेकर, वन परिक्षेत्रपाल (लेपर्ड मॅन)

बीवायके ते इंदिरानगर?

शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कॉलेजरोडवरील श्रद्धा पेट्रोल पंप व बीवायके परिसरात दिसलेला बिबट्याच पुढे तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राकडून हॉटेल एसएसके, सुयश हॉस्पिटलकडून इंदिरानगरच्या दिशेने गेल्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -