घरमहाराष्ट्रउत्तर-पश्चिम मतदारसंघात 'लेटर वॉर'

उत्तर-पश्चिम मतदारसंघात ‘लेटर वॉर’

Subscribe

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत असताना उत्तर पश्चिम मतदारसंघात सध्या शिवसेना उमेदवार गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांच्यामध्यये 'लेटर वॉर' सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये कधी प्रचारातून आरोप असेल तर कधी सोशल मीडियावरून आरोप असेल हे आता कॉमन झाले आहे. पण उत्तर पश्चिम मतदारसंघात सध्या शिवसेना उमेदवार गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांच्यामध्यये लेटर वॉर सुरू झाले आहे. सत्ताधाऱ्यांना आरटीआयच्या माध्यमातून नेहमीच जेरीस आणणारे संजय निरूपम सगळ्यांना माहित आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना देखील काही महिन्यांपूर्वी संजय निरूपम यांनी आरटीआयच्या माध्यमातून जेरीस आणले होते. मात्र आता संजय निरूपम यांनी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांना थेट पत्राद्वारे आव्हान दिले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गजानन किर्तीकर यांनी देखील त्यांना पत्राद्वारे जशास तसे उत्तर दिले आहे.

- Advertisement -

निरुपम यांचे चर्चेचे आव्हान

दरम्यान संजय निरूपम यांनी विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांना त्यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा जाब विचारला आहे. तसेच यावेळी त्यांनी खुल्या चर्चेचे आव्हान देखील किर्तीकर यांना दिले आहे. संजय निरुपम यांना किर्तीकर यांनी देखील तसेच उत्तर दिले आहे. किर्तीकर यांनी तर संजय निरुपम यांना पत्र पाठवून पाच वर्षात केलेल्या कामांची यादी सोपवली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनंतर पुन्हा निरुपम यांनी त्यातील काही कामांबाबत आणि खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करुन किर्तीकरांना पत्र पाठवले. मात्र याला मात्र किर्तीकर यांनी उत्तर दिले नाही.


वाचा – संजय निरुपमना मनसेची साथ नाहीच

- Advertisement -

वाचा – ‘अच्छे दिन’च्या पोस्टरवरून शिवसेना ट्रोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -