घरमहाराष्ट्रवाहन नियमांचे उल्लंघन पडणार महागात

वाहन नियमांचे उल्लंघन पडणार महागात

Subscribe

वाहन नियमांचे उल्लंघन केल्यास तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी संबंधितांना पाठवण्यात आले आहे.

बेधडकपणे सिग्नल तोडून गाडी पळवणे, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, सुसाट गाडी पळवणे आता वाहनचालकांना महागात पडणार आहे. आता वाहन नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांचा तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द केला जाणार आहे. नियम मोडून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी संबंधितांना पाठविले आहे.

याकरता घेण्यात आला निर्णय

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. मात्र तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा ठपका अलीकडेच सर्वोच्च नायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समितीने ठेवला होता. त्यानंतर वाहतूक विभागाने नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि तसे परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार आता बेधडकपणे सिग्नल तोडून गाडी पळवणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासांना घेऊन जाणे, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, सुसाट गाडी पळवणे हे नियम मोडल्यास आता वाहनचालकांचा तीन महिन्यांसाठी वाहन परवाना जप्त करण्यात येणार आहे.

- Advertisement -

१४ नोव्हेंबर रोजी काढलेल्या या परिपत्रकात साप्ताहिक अहवाल मुख्यालयाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमुर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी दिल्लीत समितीची बैठक झाली असून या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव देखील उपस्थित होते. परवाना रद्द करण्याबाबतचा शासन आदेश गृह विभागाने ३१ डिसेंबर २०१५ रोजीच जारी केला जातो. त्यामुळे आता या जीआरनुसार कारवाईची मोहीमच वाहतूक पोलिसांकडून उघडली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या – 

वाचा – तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणार्‍या वाहनांचा परवाना होणार रद्द

- Advertisement -

वाचा – हजारो वाहन परवाने ‘गहाळ ’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -