घरमहाराष्ट्रनाशिककुख्यात गुंड रवी पुजारी गँगच्या चौघांना जन्मठेप

कुख्यात गुंड रवी पुजारी गँगच्या चौघांना जन्मठेप

Subscribe

नाशिक व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करत इंदिरानगरातील त्याच्या कार्यालयावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबईतील कुख्यात गुंड रवी पुजारी गँगच्या चार गुंडांना नाशिक विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेप आणि ५५ लाख ४५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

जयसिंग ऊर्फ संजय सीताराम डोलकर ऊर्फ संजय थापा ऊर्फ संजय नेपाळी ऊर्फ पीट (रा. मुंबई), अरविंद चव्हाण ऊर्फ चिंटू (रा. मुंबई), विकासकुमार सिंग (रा. मुंबई), संदीप रामाश्रम शर्मा ऊर्फ संदीपभैय्या अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. एकता एम्पायरचे बिल्डर अशोक मोहनानी यांच्याकडे खंडणी मागूनही ती न दिल्याने पुजारी टोळीतील दोघांनी इंदिरानगरमधील त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. बिल्डरला धमकावत जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या या गोळीबारात एक महिला व एक पुरुष असे दोन जण जखमी झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. २०१४ पासून नाशिक विशेष मोक्का न्यायालयात खटला सुरू होता. इंदिरानगरमध्ये २०११ मध्ये एका बांधकाम प्रकल्पावर जाऊन बिल्डरवर गोळीबार करणार्‍या अंडरवर्ल्डचा रवी पुजारीच्या टोळीतील आरोपी संजय सिंग, अरविंद चव्हाण व विकासकुमार सिंग, संदीप शर्मा यांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच, प्रत्येकी १५ लाख १५ हजार रुपये दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -