घरताज्या घडामोडीपावसाची एन्ट्री : राज्यासह मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी

पावसाची एन्ट्री : राज्यासह मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी

Subscribe

राज्यासह मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी

राज्यातील बहुसंख्य भागात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या सरी बरसल्याने यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असल्याची वर्दी मिळाली आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह रविवारी पाऊस झाला तर आज, मुंबईत देखील पाऊस दाखल झाला आहे. मुंबईच्या अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात थंडावा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. मुंबईतील चेंबूर, कुर्ला, सायन, अंधेरी, दादर या परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची सकाळ काहीशी दिलासादायक गेली.

अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. ‘निसर्ग’ असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी, किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

आज, जूनच्या पहिल्याच दिवशी दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २ आणि ३ जून रोजी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ३ आणि ४ जून रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, असा अंदाज आहे. मात्र, काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – राज्यात २४८७ नवे रुग्ण ८९ करोनाबाधितांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -