घरमहाराष्ट्रराज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे

Subscribe

यादीबाबत आता राज्यपाल कोश्यारी घेणार निर्णय, यादी राजभवनावर राज्यपालांकडे सुपूर्द

विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपुर्द केली. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी ही यादी राजभवनावर राज्यपालांकडे सुपुर्द केली. या यादीबाबत आता राज्यपाल कोश्यारी निर्णय घेणार आहेत.

शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित आघाडीकडून २०१९ ची लोकसभा निवडणूक नांदेडमधून लढलेले आणि काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले यशवंत भिंगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर वंचित आघाडीकडूनच विधानसभा निवडणूक लढलेले अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. याशिवाय एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

१२ उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे

राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे

काँग्रेस – रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर

- Advertisement -

शिवसेना – उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -