घरमहाराष्ट्रलॉकडाऊन-४ ची नियमावली जाहीर 

लॉकडाऊन-४ ची नियमावली जाहीर 

Subscribe

रेडझोन,उर्वरित क्षेत्र असे दोनच भाग 

*रेड झोनमध्ये फक्त घरपोच दारू                                                                                              *नाशिक महापालिका रेड झोनमध्ये                                                                                          *रिक्षा,टॅक्सीला परवानगी नाही                                                                                               *चार चाकी वाहनांना १+२ परवानगी 

देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. केंद्राच्या सुचनेनुसार अनेक राज्यांनी त्यांच्या कक्षेतही काही अधिक प्रमाणात शिथिलता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ४ बाबत नियम बदलण्यात आले आहेत. राज्यातील लॉकडाऊन संदर्भातली नियमावली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरविली आहे. ही नियमावली येत्या २२ मेपासून लागू होणार आहे. महाराष्ट्रात आता दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये बाधित क्षेत्र असणार आहे.

- Advertisement -

राज्यात आता २२ मेपासून रेड आणि उर्वरित क्षेत्र असे दोनच झोन अस्तित्वात असणार आहेत. आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो सेवा, शिक्षण संस्था, हॉटेल, शॉपिंग मॉल बंद ठेवण्यात येणार आहेत.तसेच बाधित क्षेत्र सोडून दोन्ही झोनमध्ये मद्य विक्री सुरु राहणार आहे. मात्र रेड झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जाणार नाहीत. ती घरपोच मागवावी लागणार आहे.

लग्न, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात येणार आहेत. रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना संचारबंदी लागू असणार आहे. याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय गरजेशिवाय अन्य गोष्टींसाठी ६५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि गर्भवती महिला, १० वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती रेड झोनमध्ये आहेत. राज्यातील बाकीचा भाग हा उर्वरित क्षेत्रामध्ये येणार आहे. बाधित क्षेत्राची जबाबदारी स्थानक प्रशासनावर देण्यात आली आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासनाला यावर निर्णय घ्यायचा आहे. रेड झोनमध्ये रिक्षा, टॅक्सीला परवानगी नाही. चारचाकींना १+२ परवानगी आहे. तर दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी आहे. हॉटेलना होम डिलिव्हरीची परवानगी नाही. मालवाहतूक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -