घरमहाराष्ट्रगणेशोत्सवात माणसे येणार म्हणून आंबोलीत महिनाभर लॉकडाऊन

गणेशोत्सवात माणसे येणार म्हणून आंबोलीत महिनाभर लॉकडाऊन

Subscribe

आंबोलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आणि कोरोना नियंत्रण गाव समितीने घेतला निर्णय

तळकोकणातील मुख्य पर्यटन असलेल्या आंबोलीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील एक महिना लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोव्यात ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबोली घाटमार्गाचा उपयोग केला जातो. आंबोलीत बाहेरुन येणारे लोक बाजारपेठत थांबतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेता आंबोली ग्रामपंचायत आणि कोरोना नियंत्रण गाव समितीने आंबोलीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 7 सप्टेंबरपर्यंत आंबोली गावात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, बाजार पेठा पूर्णपणे बंद राहणार असून गावाबाहेरील व्यक्तींनाही गावात येण्यास पूर्णतः मज्जाव करण्यात आला आहे. तसा ठराव देखील घेण्यात आला आहे. या निर्णयाचे आंबोली वासीयांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -