घरमहाराष्ट्र३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन त्यादरम्यान अनलॉक-२ सुरू होणार

३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन त्यादरम्यान अनलॉक-२ सुरू होणार

Subscribe

राज्यात येत्या ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून त्यादरम्यान, म्हणजे ३१ जुलैपर्यंत ‘मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा सुरू राहील, असे राज्य सरकारकडून कळवण्यात आले आहे. या कालावधीत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.

राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यात 1 जूनपासून केंद्राची नवी नियमावली आल्यानंतर राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करण्यात आले. त्यात कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागांत बर्‍याच प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. ‘मिशन बिगिन अगेन’चा पहिला टप्पा 30 जून म्हणजेच उद्या संपत आहे. त्यामुळेच 1 जुलैपासून पुढे काय, असा प्रश्न सामान्यांना होता. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याला संबोधित करताना अनेक बाबी स्पष्ट केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने लॉकडाऊन उठवले जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले होते. त्यानुसार आता शासनाकडून स्पष्टता आली आहे.

- Advertisement -

सरकारने राज्यात 31 जुलैपर्यंत ‘मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यात आधीपासून लागू असलेले बहुतेक नियम कायम राहणार आहेत. राज्यात लॉकडाऊन दरम्यान जिल्हाबंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. ही बंदी यापुढेही कायम राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागात ये-जा करण्याची मुभा आहे ती मात्र कायम राहणार आहे.

एसटीची मर्यादित सेवा राज्यात सुरू झाली आहे. ती यापुढेही तशीच राहणार आहे. केवळ आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरु केले असले तरी करोनाचे संकट टळलेले नाही, धोका टळलेला नाही, गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना केले होते. करोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसले तर नाईलाज म्हणून काही भागात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. 30 जूनला लॉकडाऊन संपणार आणि सगळेच व्यवहार पुन्हा सुरू होणार या भ्रमात राहू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनात टाळेबंदी वाढणार, असे स्पष्ट संकेत मिळाले होते.

- Advertisement -

नवीन नियमावली

=अत्यावश्यक सेवांची दुकाने आधीच्या नियमानुसारच सुरू राहणार.
=३१ मे आणि ४ जून २०२० च्या मार्गदर्शक तत्वांनुसार बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार
=मॉल आणि कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडतील.
=मद्य दुकाने जिथे परवानगी आहे तिथे उघडतील. त्यासाठी आधीचेच नियम.
=आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री करण्यास मंजुरी.
=औद्योगिक कामे करण्यास मंजुरी.
=बांधकाम साइट, मान्सूनकाळातील कामे करण्यास मंजुरी.
=रेस्टॉरंट, किचनला होम डिलिव्हरी मान्यता.
=ऑनलाइन, दूरशिक्षणाला मान्यता.
=सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती.
=खासगी कार्यालये १० टक्के उपस्थिती.
=टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी केवळ आवश्यक प्रवासासाठी उपलब्ध असेल.
=प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करून मान्यता.
=एमएमआर क्षेत्रात आवश्यक कामे आणि कार्यालयांसाठी आंतरजिल्हा (मुंबई-ठाणे इत्यादी) प्रवास करण्यास मुभा.
=लग्न व इतर कार्यक्रमासाठी मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉल यांनाच मान्यता. ५० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती नको.
=सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी.
=वर्तमानपत्राची छपाई, वितरणास परवानगी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -