घरमहाराष्ट्रयुती झाल्यामुळे मावळमधील अंतर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

युती झाल्यामुळे मावळमधील अंतर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

Subscribe

मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये नवख्या खासदाराची प्रतीक्षा येथील नागरिक करत असल्याचे चित्र सध्या सुरु असलेल्या प्रचारावरून समोर येत आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये नवख्या खासदाराची प्रतीक्षा येथील नागरिक करत असल्याचे चित्र सध्या सुरु असलेल्या प्रचारावरून समोर येत आहे. शिवसेना आणि भाजपा यांची युती झाल्यामुळे अंतर्गत पदाधिकारी नाराज झालेले दिसून येत आहेत. पनवेलमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा व्यवहार भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे दिल्याचा राग मनात धरून निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रचारातून माघार घेतल्याचे समोर येत आहे. तीच परिस्थिती उरणमध्ये सुरु आहे. याठिकाणी खालापूर, कर्जत याठिकाणी राष्ट्रवादी आणि शेकापचे पारडे जड असल्यामुळे शिवसेना भाजपाची पनवेल आणि अर्णवर असलेली मदार संपुष्टात येण्याची चिन्हे उभी राहिली आहेत. विद्यमान खासदारांनी कोणत्याही सोयीसुविधा पुरविल्या नसल्याचा ठपका ठेवत जनतेने त्यांना नाकरण्यास सुरुवात केली आहे. याचा सरळ अर्थ जनता आता अनुभवी खासदारांना कंटाळली असून त्यांना नवख्या उमेदरावाची गरज दिसून येत आहे.

बारणे विरुद्ध पार्थ पवार लढत 

राज्यातील लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान एका बाजूला तर चौथ्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहचत चालला आहे. मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार एकमेकांसमोर उभे आहेत. एका बाजूला अनुभवी राजकारणी असूनसुद्धा जनतेमध्ये तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सत्र सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला नवखा उमेदवार असून त्याला शेकापच्या मदतीने आणि पवार कुटुंबाच्या ताकदीने खंबीर बनविले आहे. संपूर्ण राज्यात खरंतर मावळ लोकसभा मतदार संघातील हि निवडणूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांना भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे हात पसरावे लागत असल्यामुळे शिवसेनेतील पदाधिकारी लाजेखातर प्रचारापासून दूर जातानाचे चित्र सध्या समोर येत आहे, तीच परिस्थिती उरण तालुक्यातही आहे. नुकतीच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र उरणमध्ये शिवसेनेचा आमदार असतानाही उरणमधील शिवसैनिकांनी या सभेकडे पाठ फिरविली आहे. यावेळी पार पडलेल्या सभेतील उपस्थित निवडक कार्यकर्त्यांमध्ये भाजपचेच कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे बारणेंना शिवसैनिकांचाच अडथळा होत असल्याचे बोलले जात आहे, मात्र बारणेंसाठी ही बाब गंभीर स्वरूपाची असल्यामुळे याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे.

- Advertisement -

बारणेंच्या सभेकडे शिवसैनिकांची पाठ

मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, रिपाई(गवई गट), पीआरपी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडीच्या वतीने उभे असलेले उमेदवार पार्थ अजितदादा पवार यांच्यापाठीशी शेकाप जोमाने उभा राहिला आहे. आज पनवेलसह खालापूर, कर्जत, उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकापचे जड असलेले पारडे पार्थ पवार यांना या निवडणुकीत सार्थ ठरवणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जेष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, इंटक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, काँग्रेसचे आर. सी. घरत, सुदाम पाटील, श्रुती म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. तर दुसरीकडे बारणेंच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांच्या सभेकडे खुद्द शिवसैनिक पाठ फिरवीत असल्यामुळे बारणेंचा गड पार्थ पवार सर करणार अशी चर्चा पनवेल तालुक्यात चर्चेत आहे.

नवख्या खासदार, आमदारांची पनवेलकरांना प्रतीक्षा

मावळ लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने वारे वाहू लागले आहेत, त्या पद्धतीने सुरु असणारी लोकसभा आणि येणारी विधानसभा या दोन्हीकडे मोदी लाट ओसरत चालली असल्याचे चित्र उभे राहत आहे. पनवेलमध्ये बहुतांश नागरिक हे बाहेरून आल्यामुळे स्थानिक पक्षांबाबत त्यांना माहिती नसते, मात्र आता बाहेरून आलेले नागरिकसुद्धा पनवेलकर झाल्यामुळे येथे विकास करणाऱ्या नेत्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिक असल्यामुळे शेकापच्या माध्यमातून होणाऱ्या कामांना तसेच त्या त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना ते आपलेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे लोकसभेसह विधानसभेलाही नवख्या खासदार आमदारांची पनवेलकर प्रतीक्षा करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -