घरमहाराष्ट्रलोकसभा निवडणूक पहिला टप्पा; १४०० मतदान केंद्रांवर लाइव्ह वेबकास्ट

लोकसभा निवडणूक पहिला टप्पा; १४०० मतदान केंद्रांवर लाइव्ह वेबकास्ट

Subscribe

राज्यात सात मतदार संघात उद्या (गुरुवार, दि. ११ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ११६ उमेदवार असून १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत. तर १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यंदा पहिल्या टप्प्यातील सुमारे १४०० मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार असून त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा देखील समावेश आहे. राज्यात सर्वाधिक ३० उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी ५ उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.

या मतदारसंघात होणार निवडणूक

वर्धा,
रामटेक,
नागपूर,
भंडारा-गोंदिया,
गडचिरोली-चिमूर,
चंद्रपूर,
यवतमाळ-वाशिम

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी आहे.

- Advertisement -
हे वाचा – देशातील २० राज्यांमध्ये उद्या होणार मतदान


मतदानासाठी आवश्यक ११ दस्तावेज

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -