घरमहाराष्ट्र'महापुरुषांचे कुटुंब माझी प्रेरणा; पवारांनी फक्त दिल्लीच्या कुटुंबाची सेवा केली'

‘महापुरुषांचे कुटुंब माझी प्रेरणा; पवारांनी फक्त दिल्लीच्या कुटुंबाची सेवा केली’

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पाचवी सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडले. “शरद पवार माझे कुटुंब नसल्याचे बोलत आहेत. पण मी आज सांगू इच्छितो की माझे कुटुंब आहे. भारतात जे महापुरुष झाले त्यांचे कुटुंब हे मी माझेच कुटुंब समजतो. मग ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, शहीद राजगूरू, चाफेकर बंधू असतील. तसेच पवारांनी त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाची प्रेरणा घ्यायला हवी होती. मात्र पवार दिल्लीतील एकाच कुटुंबाची सेवा करण्यात गुंतले आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

शरद पवार यांनी माढा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. माढात यावेळी भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. तसेच बारामतीमधून कांचन राहूल कुल निवडणूक लढवत आहेत. हो दोन्ही उमेदवार यावेळी मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थितीत होते. पहिल्या चारही सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांचे भाषण –

राम राम मंडळी, अकलूजकर कसे आहात? अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यभूमीला वंदन करुन पंतप्रधान नरेंद मोदींच्या भाषणाला अकलूज येथे सुरुवात.

आज मला विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करायला मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. विजयसिंह यांनी पन्नास वर्ष राजकारणात घालवली आहेत. त्यांच्या कार्याचा आम्ही गौरव करतो.

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे अनेक राज्यात नुकसान झाले आहे. मी सर्व राज्यांचा आढावा घेतला असून सरकार अडचणीच्या प्रसंगी जनतेच्या पाठिशी उभी आहे. ज्यांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत, त्यांच्यासोबत आमच्या सहवेदना आहेत.

शरद पवार यांनी मैदान का सोडले? हे आता मला कळले आहे. कारण ते वेळेआधीच हवेचा अंदाज घेतात. ते कधीच स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांचे नुकसान होईल, असे काम करत नाहीत. अकलूजमध्ये भगवे वादळ उठले आहे. त्याला घाबरूनच ते नऊ दो ग्यारह झाल्याची टीका मोदींनी केली.

भारतासारखा मोठा देश चालवायचा असेल तर मजबूत नेत्यासोबत मजबूत सरकारसुद्धा पाहीजे. २०१४ साली भाजपला बहुमत मिळाल्यामुळेच मी पाच वर्ष गरिबांसाठी सरकार चालवू शकलो. त्यामुळे लोकांनी आता ठरवावे की देशाला मजबूत सरकार द्यायचे की कमजोर सरकार?

२०१४ साली देखील मी महाराष्ट्रात सभा घेतली तेव्हा म्हणालो होतो, जेव्हा सरकार मजबूत असते तेव्हा नेत्यांचे तोंड नाही तर सैनिकांची बंदूक चालते. पवारांना त्यावेळी वाटले की मी काय करेल? पण मी दाखवून दिले आहे की आपल्या शत्रूवर हल्ला कसा करायचा.

मुंबईत जेव्हा हल्ला झाला होता. तेव्हाचे सरकार शांत बसले. मात्र यावेळी हल्ला झाल्यानंतर आम्ही घरात घुसून मारले. मात्र तरिही काही लोक सैनिकांच्या पराक्रमावर शंका घेत आहेत.

आम्ही पाच वर्ष सरकार चालवले. मात्र एकही भ्रष्टाचाराचा डाग आमच्यावर लागला नाही. मात्र खोटं बोलणारे बोलतच राहतील. त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत

देशात माझ्याविरोधात महाआघाडी झाली असून महाआघाडीत महामिलावट आहे. फक्त माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही.

राहुल गांधी आता सर्व मोदी आडनावाचे लोक चोर का आहेत? असा प्रश्न विचारला आहे. देशात मागासवर्गीय लोकांना चोर म्हणण्याचा प्रताप आता काँग्रेसवाले करत आहेत. माझ्यावर टीका करा पण माझ्या समाजाला यामध्ये कशाला खेचता? माझ्या मागासवर्गीय समाजाला शिव्या घालत असाल, तर ते मी सहन करणार नाही.

शरद पवारांनी माझ्या कुटुंबियांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. कुटुंबव्यवस्था ही भारताची ताकद असून ती जगाला दिलेली देण आहे. कुटुंबावरून ते माझ्यावर वाईट बोलू शकतात. ते वयाने मोठे आहेत. ते माझ्याबद्दल बोलू शकतात. पण मोदी आज जे जीवन जगत आहे, त्याची प्रेरणा परिवारातूनच घेतलेली आहे. राजगुरु, चाफेकर, महात्मा फुले, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाकडून आम्ही प्रेरणा घेतलेली आहे.

एवढंच काय तर शरद पवारांचे गुरु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याही कुटुंबाकडून मी प्रेरणा घेतलेली आहे. मात्र शरद पवार तुम्ही फक्त दिल्लीतील एका परिवाराची सेवा करण्यात गुंतला आहात. शरद पवार तुम्हाला माझ्याएवढा त्याग करायला जमणार नाही.

ऊस उत्पादकांचा प्रश्न सोडविण्यासाठी ऊसापासून फक्त साखर उत्पादित करण्यासोबत इथेनॉल निर्मितीवर लक्ष द्यायला हवे. मी सत्तेवर येण्याआधीपासून हे तंत्रज्ञान उपलब्ध होते, मात्र शरद पवारांनी त्यांच्या साखर सम्राटांना वाचविण्यासाठी योग्य निर्णय घेतले नाहीत.

२३ मे नंतर पुन्हा एकदा मोदी सरकार बनेल. त्यानंतर पीएस किसान योजना आणखी ताकदीने राबवली जाईल.

नवीन सरकार बनल्यानंतर जल मंत्रालयाची स्थापना करू. या भागातील पाण्याची समस्या काँग्रेस-राष्ट्रवादी सोडवू शकले नाहीत. मात्र आम्ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -