घरमहाराष्ट्रपेट्रोलपंपांवरील फलकांना आचारसंहितेचे वावडे

पेट्रोलपंपांवरील फलकांना आचारसंहितेचे वावडे

Subscribe

देशभर सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचा अंमल राखण्याच्या सक्त सूचना निवडणूक आयोगाने केल्या असल्या तरी तेल कंपन्यांनी मात्र आयोगाच्या या सूचनांची जराही दखल घेतली नसल्याचे दिसत आहे. देशभरातील तेलकंपन्यांच्या पेट्रोलपंपांवर विविध प्रकारच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे वाराणसीतून निवडणूक लढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छबीद्वारे उघडपणे प्रचार होत असताना आणि आचारसंहिता जाहीर होऊन आठवडा पूर्ण होत असतानाही या जाहिरातींना हात लावण्याची हिंमत आयोगाने दाखवलेली नाही.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन पाच दिवस उलटले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार सार्वजनिक क्षेत्रात लावण्यात आलेली राजकीय पक्षांचे फलक काढून घेण्याची कारवाई केली. आचारसंहितेच्या अंमलाची घोषणा झाल्यावर मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर उभारण्यात आलेले बोर्ड काढण्यात आले आहेत. मात्र राज्यभरातील पेट्रोलपंपांवर लावण्यात आलेले फलक मात्र आजही आहेत तसेच असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोलपंपांवरील फलकांवर नरेंद्र मोदी यांची छबी असून, एकार्थी यातून प्रचार केला जात असल्याचे स्पष्ट दिसते.

- Advertisement -

हे फलक काढण्यासंबंधी पेट्रोलपंपांना सूचित करण्यात आले तेव्हा त्यांनी याबाबत हतबलता व्यक्त केली. ते कंपन्यांकडे बोट दाखवत आहेत. यामुळे फलकबाजीचे हे प्रकरण आयोगाच्या कोर्टात नेण्यात येणार आहे. काँग्रेससह इतर पक्षांनी यासाठी तयारी चालवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -