घरमहाराष्ट्रअफवांना पूर्णविराम; 'त्या' दोन ठिकाणी प्रकाश आंबेडकरांच्या सभा होणारच

अफवांना पूर्णविराम; ‘त्या’ दोन ठिकाणी प्रकाश आंबेडकरांच्या सभा होणारच

Subscribe

मुंबईतील उमेदवाराच्या प्रचारासाठी विक्रोळी आणि धारावी येथे जाहीर सभा घेणार असून या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाही, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र या अफवांना पूर्णविराम लावत 'मी या दोन्ही सभांना उपस्थित राहणार', असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या मार्फत सांगितलेले आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. या प्रचारा दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि असरुद्दीन औवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीने विरोधकांना घाबरून सोडले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या सभेला तुडूंब प्रतिसाद मिळाला आहे. आघाडीतर्फे ४८ उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मुंबईतील उमेदवाराच्या प्रचारासाठी विक्रोळी आणि धारावी येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाही, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांना पूर्णविराम लावत ‘मी या दोन्ही सभांना उपस्थित राहणार’, असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या मार्फत सांगितलेले आहे.

विक्रोळी आणि धारावीत सभा घेणार

लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवाजी पार्कात विराट सभा घेऊन सर्वांचेच लक्ष वंचित बहुजन आघाडीने वेधले होते. मुंबईत प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी अंधेरी येथे जाहीर सभेला जेमतेम दीडदोनशे लोकही न आल्याने ऐनवेळी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी सभेकडे पाठ फिरवली. या पार्श्वभूमीवर आजही ईशान्य मुंबईचे उमेदवार निहारिका खोंदले आणि ऊत्तर मध्य मुंबईचे उमेदवार राजेंद्र भोसले यांच्या प्रचारार्थ अनुक्रमे विक्रोळी येथे ६ वाजता आणि धारावी येथे ८ च्या दरम्यान सभा घेणार आहेत. मात्र सोमवारची सभा फ्लॉप झाल्यानंतर आज होणाऱ्या सभेत आंबेडकर येणार नाही, अशा अफवा पसरवण्यात आल्या. मात्र या अफवा खोडत मी या सभांना उपस्थित राहणार आहे. लोकांनी मोठ्या संख्येत जमावे असा व्हिडिओ आंबेडकर यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश शेट्टी यांच्या प्रचारासाठी अंधेरीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अंधेरीच्या प्ले ग्राउंडवर या सभेची जंगी तयारी करण्यात आली होती. संपूर्ण मैदानावर खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. या सभेला प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी मार्गदर्शन करणार होते. मात्र, रात्रीचे साडेनऊ वाजले तरी व्यासपीठासमोरच्या काही खुर्च्या वगळता संपूर्ण मैदान रिकामेच होते. ही स्थिती लक्षात घेऊन आंबेडकर आणि ओवेसी यांनी या सभेकडे पाठ फिरवली. वंचित बहुजन आघाडीची ही सभा मुंबईतील आजवरची सर्वात फ्लॉप सभा ठरली आहे.


वाचा – धरणामध्ये लघुशंका करणाऱ्यांचे आम्ही गुलाम नाहीत – प्रकाश आंबेडकर

- Advertisement -

वाचा – प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांकडून वृद्धास बेदम मारहाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -