घरमहाराष्ट्रलोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र नाहीच

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र नाहीच

Subscribe

अशोक चव्हाण भविष्यवेत्ता झाले, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याच्या विरोधकांच्या आरोपावरुन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामध्ये जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. तर दोन्ही निवडणुका एकत्र होणार नसल्याचे स्पष्ट करताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काही नसल्याने आता अशोक चव्हाण भविष्यवेत्ते झाले आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

विधिमंडळ अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करुन लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घेतील, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी औरंगाबादेत केले होते. शुक्रवारी दिवसभर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले असतानाच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला. या उलट मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरच पलटवार करीत, अशोक चव्हाण यांचे विधान चुकीचे असून राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे स्पष्ट केले.

- Advertisement -

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले जात आहे. प्रशासनात आणि राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे विधान केले जात आहे. राज्य सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -