घरमहाराष्ट्ररेल्वे ओवर ब्रीजखाली लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद

रेल्वे ओवर ब्रीजखाली लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

मनमाड येथील रेल्वे ओवर ब्रिज आणि तुफान चौकात प्रवाशांना मारझोड करून लुटण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.

मनमाड येथील रेल्वे ओवर ब्रिज आणि तुफान चौकात प्रवाशांना मारझोड करून लुटण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या असून पहिल्या घटनेत पालिकेतील पाणी पुरवठा अभियंता अमृत काजवे यांना ३ जणाच्या टोळीने मारहाण करून लुटले. तर दुसरी घटना तुफान चौकात घडली असून एसटी बस स्थानकाकडे जाणाऱ्या एका प्रवाशाला बोळीत नेवून मारझोड करत लुटण्यात आले. लुटमारीच्या या दोन्ही घटनामुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी दोघांनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी मोबाईल आणि पर्स हरवल्याची नोंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पीडित

असा घडला प्रकार 

याबाबत अधिक माहिती अशी आहे की, मनमाड नगरपरिषदेतील पाणी पुरवठा अभियंता अमृत काजवे हे मूळ पुण्याचे असून सुट्टीत ते गावी गेले होते. आज, सोमवारी ते शिवशाही बस मनमाडला आले. येथे रेल्वे ओवर ब्रिजवर उतरल्यानंतर  ३ जणाच्या टोळीने त्यांना अडवले. एकाने त्यांचे दोन्ही हात धरले, तर दुसऱ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काजवे काहीसे घाबरले काही कळण्याच्या आत लुटारूंनी त्यांच्या खिशातील पाकीट आणि मोबाईल काढून पसार झाले. पाकिटात रोख रकमेसह एटीएम कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदी वस्तू होत्या. काजवे यांना लुटल्यानंतर या टोळीने ओवर ब्रिजच्या बाजूने जाणाऱ्या तुफान चौक मार्गावर एका तरुणाचा पाठलाग केला. त्याला जवळच असलेल्या एका बोळीत घेऊन गेले आणि त्यालाही मारझोड करून लुटण्यात आले. काजवे आणि या तरुणाने पोलीस स्थानकात धाव घेतली. मात्र तेथे एकच पोलीस होता. तो पण झोपलेला, त्याला या दोघांनी उठवून घडलेला प्रकार सांगितला असता तो या दोघांसोबत घटनास्थळी आला मात्र लुटारू फरार झालेले होते. या प्रकरणी दोघांनी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी पर्स व मोबाईल गहाळ झाल्याची नोंद केली. लुटारूंची टोळी तरुणाचा पाठलाग करताना व त्याला बोळीत घेवून जातानाचा सर्व प्रकार या भागात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

- Advertisement -

रेल्वेचे ओवर ब्रिज आणि तुफान प्रवाशांना मारहाण करून लुटण्यात आल्याच्या अनेक घटना या आधीही घडल्या आहेत. मात्र पोलिसांनी कडक पाऊल उचलल्या नंतर या घटनांना आळा बसला होता. परंतू बंद झालेल्या या घटना आता पुन्हा सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या लुटारूंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -