घरमहाराष्ट्रदेवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील विस्थापितांना नागरी सुविधा देणार - माधव भंडारी

देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील विस्थापितांना नागरी सुविधा देणार – माधव भंडारी

Subscribe

देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील विस्थापितांना नागरी सुविधा देणार असल्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन प्राधिकरणचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिले आहे.

देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील विस्तापितांना नागरी सुविधा आणि नवीन ग्रामपंचायत गठीत करण्यासंबंधी लवकरच पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन प्राधिकरणचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिले आहे. कुर्ली उत्कर्ष मंडळाच्यावतीने भांडारी याना मुंबई येथे निवेदन देण्यात आले. यावेळी कुर्ली उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, सरचिटणीस अनिल पाटील आदी उपस्थित होते.

कुर्ली घोणसरी येथील देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पला १९७९ साली शासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर १९९५ साली विस्थापितांना नुकसान भरपाई देण्यात आली. तर, २००२ मध्ये निवासी भूखंडाचे वाटप करण्यात आले. महसुली गाव म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र याठिकाणी शासनामार्फत गावामध्ये विस्थापितांसाठी अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. तसेच जन्म मृत्यू दाखले, पिण्यासाठी कायम स्वरूपी पाणी व्यवस्था, स्ट्रीट लाईट, डांबरी रस्ते, निवारा शेड, अंतर्गत रस्ते पूर्णतः नादुरुस्त झाले आहेत. ग्रामपंचायत इमारत व समाज मंदिर या ठिकाणी अद्यापही बांधलेले नाहीत. शिवाय, स्मशान शेड बांधलेले नाही, रस्त्यांच्या दुतर्फा असलेली गटारे पूर्णतः बुजून गेलेली आहेत. मुलांसाठी खेळाचे मैदान आदी प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर ‘त्या’ गावांतील पाणी प्रश्नासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -