घरमहाराष्ट्रकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन

कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन

Subscribe

मनमाडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन

मनमाडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे आज सकाळी ७.३० वाजता निधन झाले आहे. ९५ वर्षांने त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी राज्य सचिव, विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते, झुंजार आणि लढवय्ये अशी त्यांची ओळख होती.

माधवराव गायकवाड यांच्याविषयी

कॉम्रेड माधवराव गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारून संघर्ष करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. १९६० ते १९६२ या कालावधीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर १९७४ साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक झाली होती. त्यात कॉ. गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. १९७४ ते १९८१ दरम्यान ते नगराध्यक्ष होते. तसेच १९८५ साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदार संघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले आणि१९८५ ते १९९० त्यांनी आमदारकी भूषवली. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने देखील केली होती. शेतकरी, कामगार, महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवाज देखील उठवला होता. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते आणि आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई, कन्या अॅड. साधना असा परिवार आहे.

- Advertisement -

माधवराव गायकवाड यांची शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी होती. विशेषतः प्रदीर्घ काळ चाललेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे त्यांनी यशस्वी नेतृत्त्व केले होते. कष्टकरी – शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक लढे उभारून जीवनभर संघर्ष केला. राज्यातील कम्युनिस्ट नेत्यांच्या पहिल्या पिढीतील ते एक प्रमुख नेते होते.  – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -