माधुरी दीक्षित पुण्यातून निवडणूक लढविणार?

माधुरीला भाजप पुण्यातून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. जून महिन्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या 'संपर्क फॉर समर्थन' या मोहिमेअंतर्गत मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माधुरीच्या घरी जावून तिची भेट घेतली होती.

Pune
Madhuri Dixit may contest Lok Sabha elections from Pune
अभिनेत्री माधुरी दीक्षित

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित – नेने राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. जून महिन्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या मोहिमेअंतर्गत मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माधुरीच्या घरी जावून तिची भेट घेतली होती. माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आली असल्याच्या बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यानंतर आता माधुरीला भाजप पुण्यातून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. परंतु, माधुरीकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेले नाही. शिवाय, भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्याचबरोबर पुण्याच्या भाजप शहर अध्यक्षांनी या माहितीचे खंडन केले आहे. माधुरीच्या उमेदवारी ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – अमित शहांसाठी मातोश्रीवर ‘आमरसा’ची मेजवानी

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची नवी युक्ती

आगामी लोकसभा निवडणूकीत जिंकूण यावे यासाठी भाजपने निवडणूकीच्या एका वर्षाअगोदरपासूनच तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानाला सुरुवात केली. या अभियानाच्या माध्यमातून देशातील विविध क्षेत्रात नावारुपास आलेल्या व्यक्तींना भाजप लोकसभा निवडणूकीची उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अमित शहा ६ जून २०१८ रोजी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित – नेने आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली होती. सध्या देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकीचे वाचतावरण आहे. काही दिवसांनी लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत भाजप विविध क्षेत्रात नावारुपास आलेल्या व्यक्तींना आणि सेलिब्रिटींना उमेदवारी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – शिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका का दिला नाही? – विखे पाटील

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here