घरताज्या घडामोडीमंत्रालयातील बाटली बदलली; प्लास्टिक बाटल्या केल्या हद्दपार

मंत्रालयातील बाटली बदलली; प्लास्टिक बाटल्या केल्या हद्दपार

Subscribe

बऱ्याचदा तुम्ही मंत्रालयात कुणा अधिकाऱ्यांच्या अथवा मंत्र्यांच्या कार्यालयात गेला आणि पिण्याचे पाणी मागितले तर तुमच्या समोर येते ती प्लास्टिकची पाण्याची छोटी बाटली. पण आता यापुढे तुम्हाला मंत्रालयात पाणी प्यायचे असेल तर तुमच्या हातात येईल चक्क काचेची बाटली. त्याचे कारणच तसे आहे. कारण नव्याने आलेल्या ठाकरे सरकारने जसा निर्णयांचा धडाका लावला आहे तसाच मंत्रालयातील प्लास्टिक बॉटल्स हद्दपार करण्याकडेही भर दिला आहे. याचाच प्रत्यय सध्या मंत्रालयातील कँटिन, अधिकाऱ्याचे आणि मंत्र्यांच्या दालनात येत आहे. पूर्वी मंत्र्यांच्या दालनात ज्या बॉक्समध्ये बिसलरी पाण्याच्या छोट्या बॉटल्स दिसायच्या त्याच बॉक्समध्ये काचेच्या बॉटल्स दिसत आहेत. विशेष म्हणजे ही आवरण असलेली काचेची बॉटल्स मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या दालनात पहायला मिळते.

२०१८ मध्ये महाराष्ट्रात फडणवीस सरकारने प्लास्टिक बंदीच्या निर्णय घेतला. मात्र मंत्रालयात त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी २५० एमएलची प्लास्टिक बॉटल्स वापरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात होणाऱ्या सरकारी बैठकांमध्ये, मुख्यमंत्री कार्यालयात, सह्याद्री अतिथीगृहावर याच छोट्या प्लास्टिकच्या बॉटल्स वापरल्या जात होत्या. मात्र आता ठाकरे सरकारने ही प्लास्टिकची बॉटल्स हद्दपार करून त्या जागी काचेची बाटली आणली. विशेष बाब म्हणजे सुभाष देसाई यांच्या कार्यालयात जाणाऱ्या प्रत्येकाला काचेच्या बाटलीतून पाणी दिले जाते.

- Advertisement -

म्हणून मंत्रालयात काचेची बाटली

काही मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी मागील महिन्याभरापासून, मंत्रालयात प्लास्टिकच्या छोट्या बाटल्या बंद करण्यात आल्या असून, या नवीन काचेच्या बाटलीतून मंत्रालयात यापुढे पाणी मिळेल असे सांगितले. तसेच मागील सरकारने राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मंत्रालयातही ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर यापुढे सर्व कार्यालयात काचेच्या बाटल्यातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या काचेच्या बाटल्यामध्ये मंत्रालयातील फिल्टर केलेले पाणी भरून त्याला आवरण लावले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -