घरमहाराष्ट्रज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीवरील महापूजा बंद

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीवरील महापूजा बंद

Subscribe

समाधीचे जतन व संवर्धन करण्यासाठी निर्णय

 तीर्थक्षेत्र आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी आहे. त्या समाधीची दररोज महापूजा होत असते. त्यामुळे समाधीचा अभिषेक होत असतो. मात्र दररोजच्या अभिषेकामुळे या समाधीची झीज होत आहे. त्यामुळे या समाधीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या समाधीवरील महापूजा आता कायमची बंद करण्यात आली आहे. शुक्रवारपासून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने घेतल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने होणार्‍या या अभिषेकांमुळे समाधीची झीज होत आहे का, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यांचा अहवाल मागविण्यासाठी संस्थानने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार तज्ज्ञ समितीने १७ स्पष्टेंबर२०१९ रोजी प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन संजीवन समाधीची पाहणी केली होती. समाधीवर होणार्‍या अभिषेक व महापूजांमुळे समाधीची अधिक झीज होऊ शकते व त्यामुळे समाधीवरील दैनंदिन अभिषेकांची संख्या कमीत कमी राखली जावी, असा अभिप्राय व निष्कर्ष तज्ज्ञांनी १४ नोव्हेंबर रोजी संस्थान कमिटीकडे सादर केला होता.

- Advertisement -

त्यानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांच्याकडे कमिटीच्या विश्वस्तांनी सर्व विषय कथन केला. या विषयाचे सर्व पैलू जाणून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संजीवन समाधीवरील महापूजा व अभिषेक नियंत्रण करण्याबाबत अनुकूलात दर्शविली. मात्र भाविकांना अभिषेक व महापूजा करता यावी, म्हणून यापुढे माऊलींच्या चलपादुकांवर अभिषेक व महापूजा करण्यास संस्थानने अनुकूलता दर्शवली. त्यासाठी येथील मुक्ताबाई मंडपात पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केली जाणार असल्याचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -