घरमहाराष्ट्रनाशिकमहाकवी कालिदास कलामंदिरात होणारी महासभा अखेर स्थगित

महाकवी कालिदास कलामंदिरात होणारी महासभा अखेर स्थगित

Subscribe

करोनाच्या संकटकाळात महापौरांनी येत्या बुधवारी (दि. २०) महाकवी कालिदास कलामंदिरात महासभा बोलवली खरी; मात्र विरोधी पक्षाने त्यास जोरदार विरोध केल्याने अखेर महापौरांनी ही महासभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचे अंदाजपत्रक, पाणीकरार यासह विकासकामांच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने ही सभा घेण्याचे नियोजन होते.

करोनाच्या संकटकाळात महापौरांनी येत्या बुधवारी (दि. २०) महाकवी कालिदास कलामंदिरात महासभा बोलवली खरी; मात्र विरोधी पक्षाने त्यास जोरदार विरोध केल्याने अखेर महापौरांनी ही महासभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचे अंदाजपत्रक, पाणीकरार यासह विकासकामांच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने ही सभा घेण्याचे नियोजन होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महासभा घेतली जाऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली होती. तसेच मनपा नगरसचिव कार्यालयानेदेखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे महासभा घेण्याबाबतचे मार्गदर्शन मागविले होते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरसचिवांना पत्र पाठवून महापालिकेच्या स्तरावरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असे कळविले होते. यामुळे महासभा होणार की नाही, याकडे लक्ष लागून होते. मे महिन्याची मासिक महासभा बुधवारी (दि.२०) कालिदास कलामंदिरात बोलविण्यात आलेली होती. परंतु, यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी मनपा नगरसचिव राजू कुटे यांना सोमवारी (दि.१८) पत्राव्दारे सभा स्थगित करण्याबाबतची सूचना केली आहे. त्यानुसार बोलविण्यात आलेली सभा स्थगित करण्यात येत असल्याचे नगरसचिवांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांना पत्राव्दारे कळविले आहे. महासभेसाठी येणारे नगरसेवक, अधिकारी, त्यांचे कर्मचारी, स्वीय सहायक यासह इतरही नागरिक उपस्थित राहणार असल्याने नियमांचे पालन होते की नाही याबाबत साशंकता निर्माण केली गेली होती. तसेच महासभा बोलविल्यास त्यातून काही प्रसंग निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. यामुळे २० मे रोजी होणारी महासभा होणार नसल्याचे नगरसचिव राजू कुटे यांनी सदस्यांना कळविले आहे.

देशात आणि राज्यात लॉकडाउन ४ सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा संवेदनशील आणि गंभीर परिस्थितीत महासभा झाल्यास कोरोनाचा संसर्ग लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांना होऊ नये यासाठी महासभा पुढे ढकलावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. या सल्ल्याचा मान ठेवून सर्वपक्षीय नगरसेवकांचे व अधिकार्‍यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी होणारी महासभा महापौरांनी स्थगित केली याबद्दल त्यांचे आभार मानतो.
– अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते

महाकवी कालिदास कलामंदिरात होणारी महासभा अखेर स्थगित
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -