घरताज्या घडामोडीमहानगरच्या वृत्तानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग!

महानगरच्या वृत्तानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग!

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय कारण्यातचे निर्देश एसटी महामंडळाने एसटीच्या राज्यभरातील विभागांना पत्राद्वारे दिले आहेत

कोरोना विषाणूबाधित एसटी कर्मचाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय उपाचर मिळवण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावर प्राधान्यक्रमाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना मानसिक आधार देण्याचे निर्देश सर्व एसटीच्या विभागाला देण्यात आले आहेत. ‘एसटीचं ठाणे ठरतंय  कोरोनाचं  आगार’ या मथळ्याखाली मायमहानगरने वृत्त प्रकशित केले होते. या वृत्तांची दखल घेत एसटी महामंडळाने सोमवारी सायंकाळी कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचे परिपत्रक काढले आहे.

एसटी महामंडळाने काढले पत्रक 

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य परिवहन महामंडळातील २०० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये  सर्वाधिक कोरोनाबाधित कर्मचारी हे ठाणे विभागात असून यांचा आकडा ८६ इतका आहे. तर मुंबई विभागात ६४  कर्मचारी बाधित झाले आहेत. तसेच एसटी मुख्यालयात १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून ५  कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. मात्र या बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी किंवा त्यापासून इतर कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये, यासाठी एसटीच्या महामंडळाकडून कोणताही निर्णय घेतला नव्हता.  ज्या एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांना  त्यांच्या गावी जाण्याचा अजब सल्ला अधिकारी वर्गाकडून  दिला जात आहे. त्यामुळे गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सुद्धा धोका निर्माण होत आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यांच्या औषधाचा खर्च उचलणे गरजेचे आहे. तसेच त्यांना सकस आहार देणे आणि विलगीकरण कक्षांची सुविधा देणे, एसटीचे आगार, कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह निर्जंतुकीकरण करणे  एसटी महामंडळाने  गरजेचे  आहे. मात्र यावर एसटी महामंडळाकडून सर्रास दुर्लक्ष करत होते. यासंबंधिचे वृत्त मायमहानगर आणि आपलं महानगरने प्रकाशित केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने उपाययोजनांचे परिपत्रक काढले आहे.

st

- Advertisement -

काय आहे पत्रक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय कारण्यातचे निर्देश एसटी महामंडळाने एसटीच्या राज्यभरातील विभागांना पत्राद्वारे दिले आहेत. या पत्रात, कोरोना विषाणूबाधित एसटी कर्मचाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावर प्राधान्यक्रमाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच  कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक असते. अशा  वेळी विभाग, नियंत्रक, कामगार अधिकारी, संबंधित आगाराच्या आगार व्यवस्थापकांनी  वैयक्तिक लक्ष देऊन बाधित कर्मचाऱ्यांची तसेच कुटुबियांची वारंवार चौकशी करून धीर द्यावा. तसेच कोरोनाबाधित कर्मचारी आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करून, वैद्यकीय सल्ल्यानुसार विलगीकरण करणे आवश्यक असल्यास त्यांचे तात्काळ विलगीकरण कारण्याबाबत आरोग्य विभाग / स्थानिक प्रशासनास कळविण्यात यावे.  असे

अशी आहे सक्ती

या पत्रात, एसटी कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे. कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून  देण्यात यावे, कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंसिन्गचे पालन करावे, एसटीच्या आगरात किंवा कार्यालयात कोरोनाबाधित आढळ्यास तात्काळ कार्यालय  स्थानिक प्रशासनातर्फे  सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण  करण्यात यावे, एसटीचे आगार, कार्यशाळा, चालक – वाहक विश्रांतीगृह, बस स्थानके येथे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने तो परिसर निर्जंतूक करण्याची सक्ती सर्व विभागांना करण्यात आली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -