घरमहाराष्ट्रमहापरिनिर्वाणदिनी यावर्षी पुन्हा वही-पेन उपक्रम

महापरिनिर्वाणदिनी यावर्षी पुन्हा वही-पेन उपक्रम

Subscribe

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना आदरांजली वाहताना हारफूले – मेणबत्ती – अगरबत्ती ऐवजी वह्या आणि पेन वाहून त्यांना आदरांजली वाहावी, असे आवाहन ‘एक वही, एक पेन’ अभियानाच्यावतीने करण्यात आले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी आदरांजली वाहण्यासाठी दादर चैत्यभूमी या ठिकाणी देशविदेशातून लाखो लोक येत असतात. यावेळी ते आपल्यासोबत हारफूले, मेणबत्ती अगरबत्ती, वाहून या महामानवाला आदरांजली वाहतात. या वस्तूंचा नंतर काहीच वापर किंपा उपयोग होत नाही. हे सर्व साहित्य वाया जाते. त्यामुळे या वस्तूंऐवजी महामानवाने शिक्षणाची शिकवण दिल्याप्रमाणे वह्या-पेन जर त्यांच्या चरणी वाहिले तर तीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन “एक वहीं, एक पेन” अभियानाचे प्रमुख राजू झनके यांनी केले आहे.

महापरिनिर्वाणदिनी रिपाइंतर्फे अभिवादन सभा

हारफुलांऐवजी वहींपेनांची आदरांजली हे वही पेनची चळवळ झालेले अभियान मागिल ३ वर्षांपासून चैत्यभूमी दादर तसेच दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी विविध संघटनांच्या माध्यमातून चालविले जात असून ज्यांना ज्यांना या दोन्ही ठिकाणी येणे शक्य होत नाही त्यांनी आपापल्या विभागात हे अभियान राबवावे असे आवाहन झनके यांनी केले आहे. जमा झालेले हे शैक्षणिक साहित्य सर्वच समाजातील गोरगरिब विद्यार्थ्यांना दिल्यास यांच्या शिक्षणाला हातभार लागलेल्या उद्देशानेच हे अभियान राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सज्ज

गत वर्षाप्रमाणे यावेळी हे अभियान मुंबईत चेंबूर पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामागे महामानव प्रतिष्ठानच्यावतीने राबविले जात असून चैत्यभूमीवरील शिवाजी पार्क या ठिकाणी भीम आर्मी तसेच फॅम या संघटनेच्यावतीने देखील हे अभियान चालविण्यात येत असून आंबेडकरी जनता तसेच ज्यांना ज्यांना या अभियानात आपला सहभाग नोंदविण्याची इच्छा असेल त्यांनी चेंबूर आणि शिवाजी पार्क येथे हे साहित्य घेऊन यावे. अधिक माहितीसाठी ९८७०१८९३४१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन झनके यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -