१९ आयारामांना घरचा रस्ता

भाजप आणि शिवसेनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेल्या आयारामांना मतदारांनी अक्षरश: झिडकारले असून, त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. पंचायतीपासून ते महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणूक भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे महायुतीला वातावरण अनुकूल असल्याचं हेरून काही आमदारांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला होता.

निवडणुकीपूर्वी तब्बल ३५ आयारामांनी महायुतीत प्रवेश केला होता. त्यापैकी १९ आयारामांचा पराभव झाला. तर १६ आयारामांचा विजय झाला. पराभूत झालेल्या आयारामांपैकी शिवसेनेत आलेल्या १९ आणि भाजपमध्ये आलेल्या ८ आयारामांचा समावेश आहे. ३५ आयरामांपैकी १० आयाराम निवडणून आल्याने भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपला शंभर पर्यंतचा आकडा गाठता आला आहे.

भाजपतील पराभूत आयाराम
वैभव पिचड (अकोले)
हर्षवर्धन पाटील (इंदापूर)
गोपालदास अग्रवाल (गोंदिया)
गोपीचंद पडळकर (बारामती)
धैर्यशील कदम (कराड उत्तर)
रमेश आडसकर (माजलगाव)
भरत गावित (नवापूर)

सेनेत दाखल झालेले पराभूत आयाराम
दिलीप सोपल (राष्ट्रवादी)
जयदत्त क्षीरसागर (बीड)
भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर)
शेखर गोरे (माणखटाव)
रश्मी बागल (करमाळा)
विजय पाटील (वसई)
संजय कोकाटे (माढा)
दिलीप माने (सोलापूर मध्य)
नागनाथ क्षीरसागर (मोहोळ)
निर्मला गावित (इगतपुरी)
प्रदीप शर्मा (नालासोपारा)