काही तासांतच अनिल डिग्गीकर यांची दुसऱ्यांदा बदली; तर प्रवीण दराडेंची उचलबांगडी

Anil Diggikar and Pravin Darade
अनिल डिग्गीकर आणि प्रवीण दराडे

पोलिसांच्या बदल्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. म्हाडाच्या उपाध्यक्षपदी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव होते. विशेष म्हणजे दुपारी निघालेल्या ऑर्डरप्रमाणे अनिल डिग्गीकर यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र काही वेळातच त्यांची म्हाडाच्या उपाध्यक्षपदी बदली करण्यात आली. तर प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती पुणे जिल्ह्याच्या समाजकल्याण कल्याण आयुक्त पदावर करण्यात आली आहे. या पदावर काही काळापुर्वी प्रविण दराडे यांची नियुक्ती केली होती. मात्र आता त्यांना या पदावरुन हटविण्यात आले आहे. मात्र त्यांची बदली कुठे केली? हे अद्याप कळू शकलेले नाही.

पुढील बदल्या खालीलप्रमाणे –

– विवेक जॉन्सन अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा या पदावर

– अमित सैनी सहायक विक्रीकर आयुक्त मुंबई यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ मुंबई या रिक्त पदावर

– दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम, यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गोंदिया या पदावर

– एस राममूर्ती, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी बुलढाणा या रिक्त पदावर