घरताज्या घडामोडीहुश्श! आता बारावीतही नापासचा शेरा पुसला जाणार

हुश्श! आता बारावीतही नापासचा शेरा पुसला जाणार

Subscribe

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासचा शेरा आता पुसला जाणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापासचा शेरा पुसला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरुन अनुत्तीर्ण शेरा पुसून ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ किंवा ‘कौशल्य विकासासाठी पात्र’ शेरे देण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरविले आहे. दहावीसाठी चार वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला असून, आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी – मार्च २०२० च्या परिक्षेपासून नवा निर्णय लागू होणार आहे.

यासाठी घेण्यात आला निर्णय

बऱ्याचदा एखादा विद्यार्थी परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच अनेकदा विद्यार्थी आत्महत्येचे पाऊल देखील उचलतात. त्यामुळे शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्याप्रमाणे नवीन शेरे पद्धती ३० ऑगस्ट २०१६ च्या आदेशानुसार लागू करण्यात आली होती. ती आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आमलात आली जाणार आहे. विशेष म्हणजे एखादा विद्यार्थी जर एक – दोन विषयांमध्ये किंवा तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास फेरपरीक्षेस पात्र असा शेरा गुणपत्रिकेत नोंदवला जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाशिवरात्रीच्या उपवासाचा डाएट प्लॅन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -