घरमहाराष्ट्रउपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

Subscribe

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप टाकणाऱ्या महाराष्ट्रातील ४ दिव्यांगांना आणि दिव्यांगांसाठी उल्लेख्य करणाऱ्या २ व्यक्ती आणि ३ संस्थांचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप टाकणाऱ्या महाराष्ट्रातील ४ दिव्यांगांना आणि दिव्यांगांसाठी उल्लेख्य करणाऱ्या २ व्यक्ती आणि ३ संस्थांचा आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त विज्ञान भवनात देशातील दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार २०१८’ प्रदान करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विविध १४ श्रेणींमध्ये महाराष्ट्रातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांसह देशातील एकूण ५६ व्यक्ती आणि १६ संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

राज्यातील चार दिव्यांगांचा सन्मान

नागपूर येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे यांना सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून पुणे येथील चार्टर्ड अकाऊंटंट भूषण तोष्णीवाल यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्कार, देण्यात आला आहे. तर नाशिक येथील स्वयं पाटील याला सृजनशील बालकाचा पुरस्कार तर आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

- Advertisement -

डॉ योगेश दुबे आणि प्रा. रवी पुवैय्या यांचा सन्मान

मुंबईतील बोरीवली पूर्व येथील डॉ. योगेश दुबे दिव्यांगांसाठी कार्यरत आहेत. त्यांनी दिव्यांगांसाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी दिव्यांगांना आधार कार्डद्वारे लिंक करून दिव्यांग कनेक्ट ॲप सुरु केले असून हे कार्य भारतात प्रसिद्ध झाले. दिव्यांगांना त्यांनी तीन चाकी वाहने, व्हिलचेअर, स्टिक आदी साधनांचे मोफत वाटप केले. त्यांच्या या वैविध्यपूर्ण कार्याची दखल घेऊन दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयआटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी जेलो कम्युनिकेटर तंत्रज्ञान विकसित केले आहे. तर या माध्यमातून मंदबुद्धी मुलांना आपल्या सभोवतालच्या लोकांशी संवाद साधण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान आता फ्लॅशकार्डच्या माध्यमातही उपलब्ध आहे.

पुणे येथील मॉडर्न कॉलेजला पुरस्कार प्रदान

दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून दोन संस्थांना आज सन्मानित करण्यात आले. या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत देशात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर राहुल जाधव यांनी हा पुरस्कार स्विकारला तर खाजगी क्षेत्रात पुणे येथील मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ट ठरले महाविद्यालयाच्या प्रमुख ज्योत्स्ना एकबोटे यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर स्किपींग लिंक्स, फाँट अँड कलर चेंजिंग, प्रायर एचटीएमएल/सीएसएस टॅगिंग अँड स्क्रिप्ट व्हॅलिडेशन आदी दिव्यांगांना पूरक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मॉडर्न महाविद्यालयाच्या संकेतस्थळाची मोझिला आणि गुगल क्रोम ब्राऊजरच्या नवीन तृतीय व्हर्जनवर जॉ १७ आणि एनव्हीडीए १६ रिडर्सच्या माध्यमातून चाचणी, संकेतस्थळाच्या प्रत्येक पानावर दिव्यांगांसाठी सुगम्य हा पर्याय देण्यात आला आहे, जो दृष्टीबाधितांना २०० टक्के पेक्षा जास्त आकारात हे पान मोठे करून पाहण्यास मदत करते. मुंबई येथील वरळी सीफेस भागातील नॅब इंडिया(नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड) या संस्थेला दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार संस्थेचे महासचिव एस.के.सिंग यांनी स्विकारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -