घरमहाराष्ट्रकर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उदया जाहीर!

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उदया जाहीर!

Subscribe

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उदया शुक्रवारी जाहीर होणार आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर झाली होती, तर दुसरी यादी उदया शुक्रवारी जाहीर होणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे.

कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखत्याची पहिली यादी घोषित केली आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नये. यामध्ये अचूकता यावी हा टप्प्याने याद्या जाहीर करण्याचा उद्देश आहे असे सांगून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी २८ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी जाहीर होईल अशी माहिती दिली आहे. पहिल्या यादीमध्ये अद्याप तरी त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

- Advertisement -

याद्या टप्प्याटप्प्याने होणार जाहीर 

३१ मार्चपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा न झाल्यास संबंधित शेतकरी आणि बँकांचे कर्ज खाते थकीत होणार असल्याने बँकाही अडचणीत येणार आहेत. ही तांत्रिक बाब असून, यामध्ये मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे’, अशी विनंती शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केली. आत्तापर्यंत सरकारकडे 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती आली आहे. त्यावर काम सुरु झालं आहे. टप्प्याटप्प्याने ही यादी जाहीर केली जाईल. तसेच यात पूर्ण पारदर्शकता असेल. पहिल्या सरकारच्या काळात आम्ही लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, ती यादीच जाहीर झाली नाही. म्हणून आम्ही प्रथम याद्या तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -