घरCORONA UPDATEमहाराष्ट्रात कोरोनावर उपचारांसाठी औषध येणार! ठाकरे सरकारचा निर्णय!

महाराष्ट्रात कोरोनावर उपचारांसाठी औषध येणार! ठाकरे सरकारचा निर्णय!

Subscribe

जगभरात ज्या कोरोनानं थैमान घातलं आहे, त्या कोरोनाला आवर घालण्यासाठी मोठ्या संख्येने औषधाची खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये १० हजार डोस खरेदी केले जाणार असून उपलब्धतेनुसार नव्या डोसची खरेदी केली जाणार आहे. या औषधांचा साठा अपुरा असल्यामुळे सुरुवातीला फक्त १० हजार डोस खरेदी केले जाणार असून उपलब्धतेनुसार पुन्हा खरेदी केली जाणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे या औषधाची खरेदी बांगलादेशकडून केली जाणार आहे.

- Advertisement -

रेमडेसिवीरची होणार चाचणी

गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमधल्या कोरोनाबाधितांवर रेमडेसिवीर औषधाचा प्रभावी परिणाम दिसून आल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. खुद्द अमेरिकेकडूनच तसे दावे करण्यात आले आहेत. निरनिराळ्या प्रयोगशाळांममध्ये, प्राण्यांवरच्या प्रयोगांमध्ये आणि वैद्यकीय अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांवरून MERS-CoV आणि SARS वर या औषधाचा मोठा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळेच रेमडेसिवीर खरेदी करण्याच आल्याचा निर्णय घेतल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, याआधीच रेमडेसिवीर रुग्णांवर वापरण्यापूर्वी त्याच्या काही चाचण्या करण्यात येणार असल्याचं देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

- Advertisement -

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली असून त्यामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे. WHOने सुचवल्यानुसार Covid 19च्या उपचारांमध्ये रेमडेसिवीरचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे औषध अत्यंत महाग असून गरीबांना ते परवडावं या दृष्टीने त्याची खरेदी केल्याचं टोपेंनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, रेमडेसिवीरची चाचणी जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -