घरमहाराष्ट्रदुष्काळग्रस्त शेतकऱ्याला सरकारकडून ४ रुपयांची मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला सरकारकडून ४ रुपयांची मदत

Subscribe

सोलापूरच्या एका गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला राज्य सरकारने चार रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहेत.

राज्यभरात भीषण दुष्काळ पडला आहे. या दुष्काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. या परिस्थितीत सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी. मात्र, सध्या वेगळेच पाहायला मिळत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत ऐवजी शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचे जनसामान्यांमध्ये म्हटले जात आहे. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. सोलापूरच्या ढवळस गावातील एका शेतकऱ्याला राज्य सरकारने दुष्काळापोटी ४ रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

सोलापूरच्या ढवळस गावातील शेतकरी पंडीत इंगळे यांची एक एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत सुरुवातीला ऊस लावला होता. मात्र ऊस जळून गेला. त्यामुळे त्यांनी त्या जागेवर तूर लावली होती. मात्र यातही इंगळे यांना अपयश आले. तूरीचे पीक देखील जळून गेले. त्यानंतर दुष्काळाचा दौरा करण्यासाठी आलेल्या तलाठीला त्यांनी सर्व परिस्थिती दाखवली. मात्र, सरकारकडून फक्त चार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यांच्या बॅंक खात्यात सरकारकडून फक्त चार रुपये आले आहेत. त्यामुळे सराकरकडून ही क्रूर चेष्टा करण्यात आल्याचे इंगळे म्हणाले आहेत. याशिवाय बॅंकेतून कमीतकमी ५०० रुपये काढता येतात. त्यामुळे सराकारने दिलेले चार रुपये कसे काढायचे, असा प्रश्न इंगळे यांना पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -