CoronaVirus : राज्यपाल, बच्चू कडू, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते १ महिन्याचे वेतन देणार

Mumbai

करोना व्हायरसा समुळ नष्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहेच. मात्र आता लोकप्रतिनिधींनी देखील आपली जबाबदारी उचलायला सुरुवात केली आहे. दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्यानंतर इतर लोकांनीही पुढाकार घेतला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले एक महिन्याचे वेतन आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. देश आणि राज्य कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपापले योगदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे मी माझे एक महिन्याचे वेतन देत आहे.

 

राज्यासह देशात कोरोनामुळे लॉकडाऊन घेण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य आणि केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी आणि संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून, शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान सदस्यांनी सदर धनादेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.

तर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्रक काढले आहे.

Eknath Shinde
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले एक महिन्याचे वेतन दिल

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here