घरताज्या घडामोडीMaharashtra Gram Panchayat Election Result 2021 Live Update: मोठा विजय मिळवल्याचा दावा...

Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 Live Update: मोठा विजय मिळवल्याचा दावा करत चंद्रकांत पाटलांनी वाटले पेढे

Subscribe

मुंबई – भाजपने एकटे लढूनही घवघवीत यश मिळवले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत २०१२ जागांवर विजय मिळवल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. खानापूरमध्ये ३ हजार जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच स्थानिक आघाड्यांसह भाजप मोठा पक्ष ठरला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपने या ग्रामपंचायत निवडणूकीत घवघवीत यश मिळवले असल्याच्या आनंदात पेढे वाटले आहेत.


मुंबई – महाविकास आघाडीला जनतेनं विश्वास दाखवला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीतील ८० टक्के जागा ह्या महाविकास आघाडीच्या पारड्यात असल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच चंद्रकांत पाटलांना स्वतःची ग्रामपंचायत राखता आली नाही असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

- Advertisement -

मुंबई – ग्रामपंचायत निवडणूकीच्या आलेल्या निकालातून जनतेने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला असल्याचे सिद्ध झाले आहे. शहरातील आणि गावातील लोकांचा महाविकास आघाडीवर विश्वास कायम आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास महाविकास आघाडीवरच आहे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.


मुंबई – ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपने जागा जिंकल्या आहेत. तसेच विदर्भ कोकणात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान महाविकास आघाडीवर जनतेचा रोष असल्याचे दिसले आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

औरंगाबाद – औरंगाबाद निकालाची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि मुलीचा दारुण पराभव झाला आहे. पिशोर ग्रामपंचायतीत हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा पराभव झाला आहे.


नांदेड – लोहा आणि कंधार तालुक्यातील ग्राम पंचायतीवर भाजपाचा वरचष्मा, कंधार तालुक्यातील 12 तर लोहा तालुक्यातील 20 ग्राम पंचायातीवर भाजपचे वर्चस्व, वर्चस्व राखन्यात खासदार चिखलीकर यांना यश


नाशिकच्या 565 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर, 164 जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा

नाशिक जिल्हा

565 ग्रामपंचायत सगळे निकाल जाहीर

पक्षीय निकाल

राष्ट्रवादी – 164

काँग्रेस – 50

शिवसेना – 143

भाजप – 109

मनसे – 0

पक्षविरहित – 98

टाय – 1


गोंदिया जिल्हात 189 पैकी 90 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर

निकाल जाहीर- 90 ग्रामपंचायत निकाल जाहीर

काँग्रेस – 101

राष्ट्रवादी – 40

शिवसेना – 20

भाजप – 80

मनसे – 01

स्थानिक आघाडी – 15


पुर्व हवेली ग्रामपंचायत अपडेट, हवेली तालुक्याच्या सोरतापवडी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादीची बाजी, विद्यमान सरपंचांच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी, तर विरोधी पॅनलला आठ जागा.


भाजप आमदार मेघना बोर्डीकरांना धक्का , बोरी ग्रामपंचायतमध्ये 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचा विजय , राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाचा विजय


लासलगावच्या वार्ड क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार आणि परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना 399 समान मते, एका लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढत परिवर्तनचे संतोष पलोड विजयी


कल्याण तालुक्यातील खडवली ग्रामपंचायतीमध्ये एका प्रभागात भाची विरुद्ध मामी लढत, या निवडणुकीत मामीला पराभूत करून भाची प्रियंका राजेश भोईर यांनी विजय मिळवला.


जालना : जिल्ह्यातल्या भोकरदन मतमोजणी केंद्रावर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज,


हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील आखाडा, बाळापुर ग्रामपंचायत काँग्रेसला विजय, आखाडा बाळापूर ग्रामपंचायत निवडणूक निकालत काँग्रेसच्या साई ग्रामविकास पॅनलने बाजी मारली, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या पॅनेलने 13 जागा मिळवत एक हाती सत्ता प्राप्त केली, तर शिवसेनेच्या पॅनेलला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागत आहे.


बीड : शहरालगतची बहिरवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात, बहिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये संदीप क्षीरसागर गटाच्या दहा जागा विजयी, तर जयदत्त क्षीरसागर गटाला तीन जागांवर विजय


इंदापूर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत निमगाव केतकीमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गटाचे वर्चस्व, 17 जागांपैकी 12 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का


चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचं मूळ गाव असलेल्या गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथे काँग्रेस समर्थीत करंजी ग्रामविकास परिवर्तन आघाडीला 11 पैकी 5 जागा तर अपक्ष 6 जागी विजयी


नांदेड :हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर आणि हदगाव तालुक्यातील रुई गावात राष्ट्रवादीची सत्ता, दोन्ही गावातील नऊ पैकी नऊ जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी.


राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या बोदवड तालुक्यातील मनोर बुद्रुक येथे असलेले पॅनल पराभूत..


जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक गावातील वॉर्ड क्रमांक 4 मधून तृतीयपंथी उमेदवार अंजली (गुरू संजना जान) पाटील यांना विजय मिळाला आहे.


भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनाही भोदरदन तालुक्यात धक्का, भोदरदनमधील प्रमुख गावात महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे. पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायत, सिपोरा बाजार ग्रामपंचायत, वालसावंगी ग्रामपंचायत भाजपकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर पारध ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात.


नितेश राणेंनी वैभववाडीचा गड राखला आहे. नितेश राणेंच्या मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींवर भाजपला सत्ता मिळवण्यात यश आले तर शिवसेनेला अवघ्या 4 ग्रामपंचायती समाधान मानावे लागले.


खेड शिवापूरची ग्रामपंचायतीत शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे यांनी राखला शिवसेनेचा गड, 11 जागांपैकी 9 जागा शिवसेनेला तर अवघ्या 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला


अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेवाळीमध्ये शिवसेनेला धक्का बसला असून 11 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या आहेत.


जावळी तालुक्यातील कुडाळ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. कुडाळ ग्रामपंचायतीमध्ये सौरभ शिंदे गटाला ७ जागा मिळाल्या आहेत.


दक्षिण सोलापुरात कुंभारी गावात भाजप नेते आणाराव बाराचारे, शिरीष पाटील गटाला यश आलं आहे. कुंभारी ग्रामपंचायतीत १७ पैकी १३ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे.


उस्मानाबाद – कळंब तालुक्यातल्या बोर्डा गावात भाजपप्रणित ग्रामविकास पॅनलच्या विजयाची हॅटट्रिक झाली आहे. ७ पैकी ६ जागांवर भाजपप्रणित पॅनल विजयी झाले आहे.


शिर्डीच्या राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात सत्तांतर झाले असून १७ पैकी १३ जागांवर परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे.


नाशिक – पालखेड गावात भाजपची मुसंडी, शिवसेनेच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. भाजपने पालखेड ग्रामपंचायतीत झेंडा रोवला आहे.


परभणीतील झरी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर,जनसेवा पॅनलाचा १७ पेकी ११ जागांवर विजय


औरंगाबादमधील पोटाद्या ग्रामपंचायती निवडणुकीसाठी भास्कर पेरे यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील उभ्या राहिल्या होत्या. पण त्यांच्या पराभव झाला आहे. अनुराधा यांना १८६ मत मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेले दुर्गेश खोपट यांना २०४ मत मिळाली आहेत. दरम्यान पाटोद्यातील ८ ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोधी निवडणूक झाली आहे.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच गट पराभूत झाला आहे. तांदुळवाडी ग्रामपंचायत भाजपच्या हातून गेली आहे. यामुळे दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुख गटाला धक्का बसला आहे.


पुणे- डोणजे ग्रामपंचायतीमध्ये सर्व ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या आहेत.


यवतमाळ – महागाव तालुक्यातील आमनी गावात सुनील राठोड गटाला ९ पैकी ६ जागा मिळालेल्या आहेत.


चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठा नारायण राणे आणि विखे पाटलांना देखील धक्का मिळाला आहे. खानपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करूनही भाजपचा पराभव झाला आहे. लोणीखुर्दमध्ये विखे पाटलांना धक्का मिळाला आहे.


परभणी-गंगाखेडच्या मालेवाडीत ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे.


कोल्हापूरच्या कोगे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या मूळगावी खानापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. खानापूरमध्ये शिवसेनेने बाजी मारली असून प्रकाश अबिटकर यांच्या गटाला ६ जागी यश मिळालं आहे.


साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. कोरेगावातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील चार ग्रामपंचायती शिवसेनेकडे आल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना कोरेगाव तालुक्यात धक्का बसला आहे.


हिवरे बाजारामध्ये पोपटराव पवार विजयी झाले आहेत. ७-० फरकारने पोपटराव पवारांनी हिवरे बाजार ग्रामपंचायत जिंकली आहे.


पाटण तालुक्यातल्या ६ ग्रामपंचायती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गटाकडे गेलेल्या आहेत.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे नऊ जागांवर देशमुख पॅनलचा विजय झाला आहे.


हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनंतर निवडणुका झाल्या आहेत. हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांच्या पॅनेलला आघाडी मिळाली आहे. एकूण ५ जागांवर पोपटराव पवारांच्या पॅनेलला आघाडी मिळालेली आहे.


माळशिरसमध्ये सध्या चुरशीची परिस्थिती आहे. माळशिरसच्या दुसऱ्या टप्प्यात विजयसिंह मोहित पाटलांचा गटाचा झेंडा पाहायला मिळत आहे. येळीव, विजयवाडी, खळवे, विठ्ठलवाडी विजयसिंह गटाने या ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील बिरदेववाडीत शिवसेनाची सत्ता स्थापना झाली आहे. ४० वर्षांची भाजपची सत्ता बिरदेववाडीत शिवसेनेने उलथवली आहे. शिवसेनेच्या पॅनेलला ७ पैकी ६ जागावर विजय मिळवण्यात यश आले आहे.


अकोल्यातल्या सांगवी खुर्द ग्रामपंचायतीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.


कराड शेनोली ग्रामपंचयातीत भाजपच्या अतुल भोसले गटाचं १२ जागांसह मोठं यश मिळालं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला कराडच्या शेनोली गावात अपयश आलं आहे.


कोकणातला पहिला निकाल हाती आला आहे. रोहातल्या वरसे गावात राष्ट्रवादीची सरशी आहे. रोहा तालुक्यातल्या वरसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १४ जागा राष्ट्रवादीकडे आल्या आहेत.


करवीर तालुका गाडेगोंडवाडी ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे. सातही जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी


हिवरे बाजार ग्रामपंचायचीत पोपटराव पवार यांच्या पॅनेलचे तीन उमेदवार आघाडीवर


सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातल्या मोटयाळा ग्रामपंचायतीत कार्तिक पाटील पॅनेलला ७ पैकी ४ जागा मिळाल्या आहेत.


साताऱ्यातील कराडमधील शेर गावात भाजप पुढे.


कोल्हापुरातल्या कोपर्डे गावात सत्ताबदल झाला आहे. शिवसेनेला धक्का देत काँग्रेसने बाजी मारली आहे.


कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील मिणचे ग्रामपंचायत शिवसेनेकडे गेली आहे.


अहमदनगरच्या मठ पिंपरी ग्रामपंचायतीत पहिल्या ३ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या संघर्ष ग्रामविकास मंडळाच्या पॅनलला मठ पिंपरीमध्ये एकूण ३ जागा मिळाल्या आहेत.


साताऱ्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. साताऱ्यातल्या उंब्रजमध्ये १४ पैकी १३ जागा भाजपच्या बाळासाहेब पाटील गटाला मिळाल्या आहेत.


सोलापूरमधील कुसमोड गावात विजयसिंह आणि धवलसिंह गटाला समान जागा मिळाल्याचे समोर येत आहे.


कोल्हापूरमधील हातकणंगलेतल्या पाडळीच्या ग्रामपंचायतीमध्ये जनसुराज्य सरशी पाहायला मिळत आहे. हातकणंगलेमधल्या पाडळीच्या ११ पैकी ११ जागा जनसुराज्य पक्षाकडे गेल्या आहेत.


यवतमाळ, बुलढाणा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.


साताऱ्यातील कराडमधील शेरे गावात भाजप पुढे आहे. तर निगडीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांच्या पॅनेलला ९ पैकी ८ जागा जिंकण्यास यश आलं आहे.


माळशिरस तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती मोहिते-पाटील गटाकडे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या तिन्ही ग्रामपंचायतीवरती भाजप वर्चस्व पाहायला मिळत आहे. दसुर, तोंडले, शेंडेचिंच या तीन ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय झाला आहे.


हिवरे बाजारात मतमोजणीला सुरुवात झाली.


कराडच्या खालकरवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली.


कराडमधील खुबी ग्रामपंचायतीमधील सर्व ९ जागा भाजपकडे आल्याचे समोर येत आहे. भाजपच्या अतुल भोसले गटाने खुबी ग्रामपंचायत जिंकली आहे.


राज्यातील ग्रामपंचायतीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे.


आजचा दिवस राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या. यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीत बिनविरोधी निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. दरम्यान कराडमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -