घरमहाराष्ट्रMaharashtra Gram Panchayat: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Gram Panchayat: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष – देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्यात पार पडेलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरु आहे. अनेक मोठ्या नेत्यांना धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने भाजपचा दारुण पराभव केला आहे. तर अनेक ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचं म्हटलं आहे. लोकांनी भाजपला प्रचंड प्रतिसाद दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भाजपला ज्या प्रकारे लोकांनी समर्थन दिलं आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. विदर्भ, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळ्याच भागांमधअये भाजप एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही पुढे गेलो आहोत. अनेक ठिकाणी संपूर्ण ग्रामपंचायती जिंकल्या. यावरुन दिसून येतं की लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे. महाविकास आघाडी सरकारबद्दलचा रोष जनतेच्या मनात आहे. त्यामुळेच एकत्र येऊन देखील यांना चांगलं यश मिळविता आलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात महाविकास आघाडीची चलती – अजित पवार


कोकणात भाजपला अभूतपूर्व यश

कोकणात भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सिंधुदुर्गात जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहोत. नारायण राणे, नितेश आणि निलेश राणे आणि इतर कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत केली. आम्ही सत्ते असताना आम्हाला जेवढं यश मिळालं नव्हतं, तेवढं यश आम्हाला रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात चांगलं यश मिळालं आहे. याचं श्रेय स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांना जातं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -