घरमहाराष्ट्रCorona: GCC Biotech चे आरटी पीसीआर किटस् सदोष- राजेश टोपे

Corona: GCC Biotech चे आरटी पीसीआर किटस् सदोष- राजेश टोपे

Subscribe

कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू

कोरोना संसर्गाच्या साथीला तोंड देण्यासाठी डॉक्टर आणि इस्पितळ कर्मचार्‍यांसाठी पुरवण्यात आलेले आरटी पीपीआर किट्स दोषपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा किट्सची संख्या साडेबारा लाख इतकी असल्याने त्यांची किंमतही काही लाखांमध्ये आहे. सदोष असलेल्या या किट्सची चाचणी एनआयव्हीने देताच पुरवठादार जीसीसी बायोटेक लि. या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कंपनीविरोधात कडक कारवाईचे आदेश

राज्यातील कोरोना संसर्गाच्या साथीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पीपीआर किटस् खरेदी करण्यात आले आहेत. वैद्यकीय संचालनालयाकडून या किट्सची खरेदी केली जाते. हे किट्स जीसीसी बयोटेक लि. या कंपनीकडून खरेदी करण्यात आले होते. किटस् सदोष असल्याची बाब एनआयव्हीने संचलनालयाच्या निदर्शनात आणून दिली. लागलीच हा पुरवठा बंद करण्यात आला असून, कंपनीविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे टोपे म्हणाले.

- Advertisement -

कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू

या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला आहे. एनआयव्हीने दिलेल्या अहवालात किटस् सदोष असल्याने चाचणीचे रिपोर्टही चुकीचे येत असल्याची बाब उघड झाली आहे. हे लक्षात आल्यावर तात्काळ जीसीसीच्या किटस् न वापरता एनआयव्हीकडील किटस्चा वापर करत चाचण्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे म्हणाले. पीपीआरचा सदोष पुरवठा करणार्‍या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे टोपे म्हणाले.


Mumbai Power Cut: मुलुंडच्या ॲपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला आग; आणखी एकाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -