घरमहाराष्ट्रMaharashtra Voting Live Update: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.३० टक्के मतदान

Maharashtra Voting Live Update: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.३० टक्के मतदान

Subscribe

देशातील एकूण १४ राज्यांमधल्या ११५ जागांवर मतदान होत असून यामध्ये महाराष्ट्रातील १४ जागांचा समावेश आहे. ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. देशातील एकूण १४ राज्यांमधल्या ११५ जागांवर मतदान झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील १४ जागांचा समावेश होता. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, सत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १४ मतदार संघामध्ये मतदान झाले असून लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रासह १५ राज्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले आहे. १५ राज्यातील ११७ जागांवर सरासरी ६१.३० टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात ५५.०५ टक्के मतदान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -