घरमहाराष्ट्रमंत्रालयातील सचिवाने पत्नीवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

मंत्रालयातील सचिवाने पत्नीवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

Subscribe

विजयकुमार पवार हे मुळचे मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवासी आहे. पत्नीवर गोळ्या धाडून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली

नंदुरबारचे माजी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयातील सचिवाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नीवर गोळ्या झाडूननंतर आत्महत्या केली. विजयकुमार यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. घरगुती वादातुन विजयकुमार यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

विजयकुमार पवार हे मुळचे मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवासी आहे. सध्या ते मंत्रालयातील कौशल्य विकास विभागातल सहसचिव म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी पत्नी सोनाली पवार हिच्यावर गोळी झाडली त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. विजयकुमार यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र घरगुती वादामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -