घरमहाराष्ट्रप्लास्टिक बंदी विरोधात मोहीम

प्लास्टिक बंदी विरोधात मोहीम

Subscribe

राज्यात प्लास्टिक बंदी असून राजगुरुनगर परिसरात सर्रास प्लास्टिक वापरले जात होते. नगरपरिषद अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत ४४.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

ऐन सणासुदीच्या तोंडावर प्लास्टिक बंदी विराधात राजगुरूनगर नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकत्रितपणे कारवाई केली आहे. राजगुरूनगर येथील आठ कापड दुकानांवर छापा टाकून चाळीस हजार रुपये दंड वसूल केला. या दुकांदारांकडून ४४.५ किलो प्लास्टिक जप्त केले. राज्यशासनाच्या प्लास्टिक बंदीला चार महिने उलटून गेले. राजगुरूनगर नगरपरिषदेने प्लस्टिक बंदी विरोधात कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे या परिसरात सर्रास प्लास्टिक वापरले जात होते. प्लास्टिक विक्री व प्लास्टिकचा वापर करणे कायद्याने गुन्हा असतानाही कापड दुकाने, पादत्राणे विक्री दुकाने, भाजी बाजार यामध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर केला जातो. शहरात बैलपोळा सण साजरा केला जात असताना व तोंडावर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथील बाजारपेठा सजलेल्या होत्या. यादरम्यान प्लास्टिक बंदीची मोहीम हाती घेत शहरातील अनेक दुकानांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे समीर वस्त्रे, डॉ.भगवान माकणीकर, नगरपरिषदचे सुनील निकाळजे, स्वाती पाटील, गणेश देव्हरकर, उदाराम लिखार सहभागी होते.दरम्यान अनेक दुकांनांमधील वस्तु,कपड्यांसाठी प्लास्टिकचा वापर केला जात होत्या. यावर पर्यायी उपाययोजना जेव्हा होईल तेव्हाच प्रत्येक्षात प्लास्टिकचा वापर संपेल असे सांगण्यात येत आहे.

शहरातील व्यापारी व नागरिकांची एकत्रित बैठक घेऊन प्लॅास्टिकबंदी प्रत्येक्षात करुन नियम व कायदे यांची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये नागरिक व व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर करणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते, तरी शहरातील अनेक ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यापुढे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिकचा वापर व विक्री करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष राजगुरुनगर नगरपरिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -