घरमहाराष्ट्रदिवसभरात ११६ पोलिसांना कोरोना, आठवड्याभरात ४०० हून अधिक पॉझिटिव्ह

दिवसभरात ११६ पोलिसांना कोरोना, आठवड्याभरात ४०० हून अधिक पॉझिटिव्ह

Subscribe

महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाने घेतले आपल्या विळख्यात...

कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. दरम्यान कोरोनाबाधित पोलिसांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी अवघ्या एका दिवसात तब्बल ११६ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

६ दिवसात ४००हून अधिक पोलीस पॉझिटिव्ह

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण २ हजार २११ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर गुरूवारी महाराष्ट्र पोलीस दलातील १३१ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. साधारण आठवड्याभरातील ६ दिवसात ४००हून अधिक पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

Blog: ‘कोरोनातून मुक्त झालेल्या आव्हाडांनी सांगितला कोरोनापासून वाचण्याचा उपाय’

कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण २४९ पोलीस अधिकारी आणि १ हजार ९६२ कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. गुरूवारी तीन पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला असून एका दिवसात ७३ पोलीस बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यादरम्यान दिलासादायक बाब म्हणजे ९७० पोलीस कर्मचाऱी आतापर्यंत बरे होऊन सुखरूप घरी परतले असल्याचे वृत्त TV 9 ने दिले आहे.

संचारबंदी दरम्यान पोलिसांवरील हल्ल्यात वाढ

तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदी दरम्यान पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. पोलिसांवर २५४ ठिकाणी हल्ले झाले असून या प्रकरणी ८३३ हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आले आहे. नागरिकांच्या हल्ल्यात एकूण ८६ पोलीस जखमी झाले आहेत. तर राज्यभरात संचारबंदी दरम्यान कोविड संदर्भात १ लाख १८ हजार ४८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -