राज्यात ‘या’ ठिकाणी आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

maharashtra rain update heavy rainfall in the state
राज्यात 'या' ठिकाणी आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात एकीकडे कोरोना विषाणूचं सावट कायम आहे. या कोरोनामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे परतीचा पावसाने अक्षरशः राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले आहे. राज्यभरातील भात, सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, ऊस, मका आणि फळभागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आता राज्याभरात आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज हवान खात्याने दिला आहे.

दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांश ठिकाणी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस सक्रिय आहे. त्यामुळे हवामान खात्याने १२ ते १७ या कालावधीत म्हणजेच सुमारे आठवडाभर कोकणासह आतील भागातील अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस सक्रिय राहिला. तसेच १२ ऑक्टोबरपासून सहा दिवस विजांच्या कडकडाटासह जोदार वारे वाहण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात १२ ऑक्टोबरला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर १३ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण, गोव्यासह विदर्भातील काही ठिकाणी मुसधार पावसाचा अंदाज आहे. १४ आणि १५ या दोन्ही दिवशी कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची तर मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


हेही वाचा – राज्यात लोकल, मंदिर, जीम बंदच राहणार