Corona Update: राज्यात १२,२४८ नव्या रुग्णांची नोंद, ३९० जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार २४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Maharashtra reports 12,248 new #COVID19 cases and 390 deaths today
Corona Update: राज्यात १२,२४८ नव्या रुग्णांची नोंद, ३९० जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार २४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख १५ हजार ३३२वर पोहोचला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.४५ टक्के एवढा आहे.

३९० जणांचा मृत्यू

राज्यात आज ३९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत १७ हजार ७५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या मृत्यदर ३.४५ टक्के एवढा आहे. तर सध्या राज्यात १० लाख ५८८ व्यक्ती या होमक्वारंटाईन आहेत तर ३४ हजार ९५७ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात एकूण १ लाख ४५ हजार ५५८ Active रुग्ण आहेत.


हेही वाचा – Corona Quarantine : गणपतीसाठी गावी येणार्‍यांना क्वारंटाईन व्हावेच लागणार!