Coronavirus in Maharashtra: चिंता कायम! राज्यात पुन्हा २२ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद!

Maharashtra Live Update Covid stat
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसाला २० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २२ हजार ५४३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २९ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ११ हजार ५४९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७० टक्के एवढा आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ५२ लाख ५३ हजार ६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १० लाख ६० हजार ३०८ (२०.१८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ८३ हजार ७७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३७ हजार २९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात २ लाख ९० हजार ३४४ Active रुग्ण आहेत.

जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत महाराष्ट्राने अनेक बड्या देशांना मागे टाकले आहे. यामध्ये स्पेन, साऊथ आफ्रिका, इराण, फ्रान्स, ब्रिटन यांसारखे देश आहेत. तसेच येत्या दिवसात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत चौथ्या क्रमांकवर असलेल्या रशियाला देखील मागे टाकेल. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत रशियात १० लाख ६२ हजार ८११ कोरोनाबाधितांचा आकडा आहे. तसेच यापैकी १८ हजार ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २०८५ १६९७४१ ४१ ८१५०
ठाणे ३०८ २४११४ ५८५
ठाणे मनपा ३७८ ३१४२९ ११ १०३४
नवी मुंबई मनपा ४०३ ३३७०८ ७३०
कल्याण डोंबवली मनपा ५३३ ३८७२३ ७१४
उल्हासनगर मनपा ७३ ८४१६ ३००
भिवंडी निजामपूर मनपा ३६ ४८३२   ३३१
मीरा भाईंदर मनपा १९१ १५६९४ ४६८
पालघर २२० १०९०६ १९६
१० वसईविरार मनपा २१३ २००२० ५२१
११ रायगड ६८२ २४८१० ५८३
१२ पनवेल मनपा २३५ १६५४५   ३३९
१३ नाशिक १९५ १३३५४ ३१७
१४ नाशिक मनपा ७१३ ३८१६० ६१५
१५ मालेगाव मनपा ४० ३११८   १२६
१६ अहमदनगर ६२० १७७१२ २४९
१७ अहमदनगर मनपा १९२ ११३०५ १८६
१८ धुळे १०८ ५८५७ १४८
१९ धुळे मनपा ६४ ४९९३ १३२
२० जळगाव ९८१ २८९५० १० ८१४
२१ जळगाव मनपा १३१ ८१७१ २०९
२२ नंदूरबार १२४ ३९९२ ९९
२३ पुणे ११२६ ४२०९१ १५ ९३७
२४ पुणे मनपा २२९४ १२८८९२ ४२ २९६६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १००४ ६१८५७ ९१०
२६ सोलापूर ६३० १९३४१ १४ ४९१
२७ सोलापूर मनपा ६३ ७८४८ ४६४
२८ सातारा ९१२ २४३२१ १९ ५९६
२९ कोल्हापूर ४३८ २२८०३ १६ ६७६
३० कोल्हापूर मनपा २४० १००१२ २५६
३१ सांगली ६४६ ११७०२ १६ ३८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५६२ १३३६२ ३५९
३३ सिंधुदुर्ग ५३ २३८९   ४०
३४ रत्नागिरी २९२ ६२३७   १८२
३५ औरंगाबाद २५६ १०३३३ १६४
३६ औरंगाबाद मनपा ४२९ १९०८९ ५९३
३७ जालना १११ ५९५८ १७०
३८ हिंगोली ७१ २०६२ ४७
३९ परभणी १२१ २१२२   ६५
४० परभणी मनपा ३८ १९९६   ६१
४१ लातूर २१५ ७४७६ २१८
४२ लातूर मनपा १०८ ५००१   १३२
४३ उस्मानाबाद २४९ ८६९९ २३५
४४ बीड २१३ ६८३३ १८९
४५ नांदेड ८६ ६५०० १६४
४६ नांदेड मनपा १०७ ४८८५ १४१
४७ अकोला ३४ २४८४ ७१
४८ अकोला मनपा ९२ २८०२ ११०
४९ अमरावती १८३ २५६९ ६८
५० अमरावती मनपा १९४ ५८५९ ११९
५१ यवतमाळ २२९ ५१४५   १११
५२ बुलढाणा २४२ ५२६४ ९७
५३ वाशिम १०१ २७५७ ५२
५४ नागपूर ४४८ ११८०८ १५५
५५ नागपूर मनपा १५३४ ३९०७७ ६९ १२०१
५६ वर्धा ८१ २२३२ २५
५७ भंडारा १९१ २९३८ १३ ४५
५८ गोंदिया ९० ३१२८   ३१
५९ चंद्रपूर १२१ ३२१४ ३२
६० चंद्रपूर मनपा १२० २३७२ २९
६१ गडचिरोली ५१ १२१३  
  इतर राज्ये /देश ४३ १०८७   १००
  एकूण २२५४३ १०६०३०८ ४१६ २९५३१